Onion Rate : ‘केंद्रा’कडून आठ जिल्ह्यांत कांदा खरेदीचे वेगवेगळे दर !

Onion Market : केंद्र सरकार यंदा ५ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. यासाठी महिन्यापासून खरेदी सुरू आहे. आतापर्यंत ५ वेळेस दरात बदल करण्यात आले असतांनाच राज्यातील आठ जिल्ह्यांत कांदा खरेदीचे वेगवेगळे दर जाहीर करून गोंधळात भर पडली आहे.
Onion Rate
Onion Rate Agrowon

Nashik News : केंद्र सरकार यंदा ५ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. यासाठी महिन्यापासून खरेदी सुरू आहे. आतापर्यंत ५ वेळेस दरात बदल करण्यात आले असतांनाच राज्यातील आठ जिल्ह्यांत कांदा खरेदीचे वेगवेगळे दर जाहीर करून गोंधळात भर पडली आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात खरेदी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला १,६५० रुपये त्यानंतर १,८५० व तिसऱ्या टप्प्यात २,१०५ रुपये, तर दोन दिवसांपूर्वी २,५५५ रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करण्यात आला होता.

मात्र बाजारात ३०० ते ४०० रुपयांनी दर अधिक निघत असल्याने हे दर सध्या बाजार दरास सुसंगत नाहीत. राज्यभरात एकूण लक्ष्यांकाच्या ९० टक्के खरेदी होताना आता ८ जिल्ह्यांत वेगवेगळे दर जाहीर केल्याने गोंधळ अजूनच वाढला आहे.

Onion Rate
Onion Market : केंद्राकडून बाजारभावापेक्षा दर पाडून कांदा खरेदी

गुरुवारी (ता.१८) केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या दरामध्ये सर्वाधिक उच्चांकी दर सोलापूर जिल्ह्यात २,९८७ रुपये आहे. तर कमी नगर व बीड या दोन जिल्ह्यांसाठी किमान २,३५७ रुपये ७२ पैसे इतका प्रतिक्विंटल दर दिला आहे.

यामध्ये ६२९ रुपये ७८ पैसे इतकी तफावत आहे.तर राज्यातील प्रमुख कांदा बाजार आवारात २,८०० ते ३,१०० रुपये दर मिळत असून हे दर व्यवहार्य नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे एकाच शेतीमालाला असे वेगवेगळे दर देताना केंद्रालाही बुद्धी सुचते तरी कुठून, असे सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आता केंद्राकडून दररोज येणार दर

पूर्वी ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन्ही केंद्रीय खरेदीदार संस्थांच्या पातळीवर दररोज खरेदी दर ठरत असायचे. मात्र यंदा खरेदीच्या सुरुवातीपासूनच ग्राहक व्यवहार विभाग दर जाहीर करत आहे. पहिल्यापासूनच हे दर बाजारातील दराशी सुसंगत नाहीत.

आता तर संबंधित जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील दराची सरासरी काढून केंद्राकडून दररोज दर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ‘तीच गुल आणि तीच काडी’ अशीच केंद्राची पुन्हा भूमिका असणार आहे.

Onion Rate
Onion Market Rate : कांदा खरेदीच्या भावावरून आणखी एक जुमला? शेतकऱ्यांना जास्त भाव मिळणार का? 

जिल्हानिहाय कांदा दर (रू.)

जिल्हा दर (प्रतिक्विंटल)

नगर २,३५७.७२

बीड २,३५७.७२

नाशिक २,८९३

धुळे २,६१०.७५

छत्रपती संभाजीनगर २,४६७.१०

धाराशिव २,८००

सोलापूर २,९८७.५०

पुणे २,७६९.८०

ज्या वेळी बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल दर मिळत होते. त्या वेळेस ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने शेतकऱ्यांकडून हा कांदा ३,५०० ते ४,००० रुपये दराने खरेदी करणे आवश्यक होते. आता बाजार समित्यांमध्ये सरकारच्या कांदा खरेदीच्या दरापेक्षा अधिकच दर मिळत असल्याने कांदा खरेदी करणाऱ्या खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांनी कांदा देऊच नये.
भारत दिघोळे, अध्यक्ष- राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com