Dhule Logistic Hub : लॉजिस्टिक हबमध्ये धुळे-शिरपूरचा समावेश

Dhule Investment : जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे विकसीत जाळे आणि पोषक वातावरणामुळे आता औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, रोजगारनिर्मितीला चालना मिळावी यासाठी प्रथमच सोमवारी (ता. २८) गुंतवणूक परिषद २०२५ होणार आहे.
Logistic Hub
Logistic HubAgrowon
Published on
Updated on

Dhule News : जिल्ह्यात औद्योगिक विकासाला पोषक वातावरणामुळे आणि भूखंडाच्या उपलब्धतेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नरडाणा एमआयडीसीला मोठ्या गुंतवणूकीचे `गिफ्ट` मिळण्याची शक्यता आहे.

यात राज्य सरकारने ७ ऑगस्ट २०२४ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिलेल्या लॉजिस्टिक धोरणांतर्गत प्रादेशिक लॉजिस्टिक हब योजनेत धुळे- शिरपूरचा समावेश केला आहे. त्यासाठी तीनशे कोटींच्या निधीची तरतूद होणार आहे.

हा प्रकल्प लवकर पदरात पडण्यासाठी पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल आणि शिरपूर, धुळे, धुळे ग्रामीणच्या आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांना पाठपुरावा करावा लागणार आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे विकसीत जाळे आणि पोषक वातावरणामुळे आता औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, रोजगारनिर्मितीला चालना मिळावी यासाठी प्रथमच सोमवारी (ता. २८) गुंतवणूक परिषद २०२५ होणार आहे.

Logistic Hub
Logistic Park: ‘लॉजेस्टिक पार्क'मुळे व्यवसायाला मिळणार गती

त्यात विविध कंपन्यांशी सरासरी चार हजार कोटींचे सामंजस्य करार केले जाणार आहेत. पायाभूत सुविधांचा विकास आणि कनेक्टीव्हीटीमुळे देशातील उद्योग जगताचे लक्ष नरडाणा व धुळे एमआयडीसीकडे आकर्षित होत आहे.

जागेसाठी पाठपुरावा

धुळे एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध नसल्याने विस्तारीत रावेर (ता. धुळे) क्षेत्रात एमआयडीसी होण्यासाठी पालकमंत्री रावल आणि धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी जागा उपलब्धतेसाठी कंबर कसली आहे. त्यास राज्य सरकारने बळ दिले तर धुळ्यापाठोपाठ प्रस्तावित रावेर एमआयडीसीच्या विकासाला गती मिळू शकेल.

Logistic Hub
Logistic Industry Subsidy: दळणवळण क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहनपर विविध सुविधा

नरडाणा एमआयडीसीच्या पहिल्या फेजमध्ये ४३१ हेक्टर क्षेत्र संपादीत झाली आहे. त्या ठिकाणी जागेची उपलब्धता आहे. तसेच दुसऱ्या फेजसाठी ६५० हेक्टर भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. पालकमंत्री रावल यांनी जोर लावल्यास ही प्रक्रिया लवकर मार्गी लागू शकते. त्यामुळे नवउद्योजक आणि नवगुंतवणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकेल.

धुळ्याला असा लाभ

या पार्श्वभूमीवर प्रादेशिक लॉजिस्टिक हबमध्ये नांदेड- देगलूर, अमरावती- बडनेरा, कोल्हापूर- इचलकरंजी, नाशिक- सिन्नर आणि धुळे-शिरपूर या पाच प्रकल्पांचा समावेश झाला आहे. प्रादेशिक लॉजिस्टिक हबमधील किमान प्रत्येकी ३०० एकर जागेवर लॉजिस्टिक सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक लॉजिस्टिक हब विकसित करण्यासाठी १५०० कोटींच्या निधीची तरतूद केली जाणार असून त्यात धुळे- शिरपूर प्रकल्पासाठी ३०० कोटींचा निधी मिळू शकेल. हे हब नरडाणा एमआयडीसीत साकारण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा मनोदय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com