Rural Development : ग्रामविकासासाठी पथदर्शी कामाचा आदर्श घ्यावा

District Development : विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत या वर्षातील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : धाराशिव जिल्ह्याने टीमवर्कच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत चांगले काम केले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील इतर जिल्ह्यांनीही धाराशिव जिल्ह्यातील पथदर्शी कामाचा आदर्श घ्यावा, आपल्या जिल्ह्यातही पथदर्शी कामे यशस्वी करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत या वर्षातील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता, अपर आयुक्त के. आर. परदेशी, उपायुक्त सुरेश बेदमुथाउपस्थित होते.

Rural Development
Rural Development: शोध निबंधांचा सहकारामध्ये समावेशाचा विचार; केंद्र सरकारचा नवा विचार!

विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, की धाराशिव जिल्हा शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गुड गव्हर्नसमध्ये जिल्ह्याने पथदर्शी काम केले आहे. जिल्हा प्रशासनाने टीमवर्कच्या माध्यमातून विविध क्षेत्रात चांगले काम केले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील इतर जिल्ह्यांनीही धाराशिवच्या पथदर्शी कामाचा आदर्श घेत आपल्या जिल्ह्यातही पथदर्शी काम उभे करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Rural Development
Rural Development : शासकीय योजना गावागावांत: ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’ची सुरुवात

छत्रपती संभाजीनगर विभागात पंचायतराज व्यवस्थेत चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रात कामाची गरज असून यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचा समतोल जपला गेला पाहिजे व गावशिवारात हिरवाई जपण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येक घटकाने वृक्षारोपणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी केले. हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी सरपंच आणि महिला प्रतिनिधी यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.

...यांना मिळाला पुरस्कार

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ग्रामपंचायत, जकेकूरवाडी, (ता. उमरगा, जि. धाराशिव) रू. १२ लक्ष, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ग्रामपंचायत, (दुधड, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) रू. ९ लक्ष, तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ग्रामपंचायत, (चौंढी शहापूर, ता. औंढा, जि. हिंगोली) रु. ७ लक्ष. विशेष पुरस्कार स्व.वसंतराव नाईक पुरस्कार सांडपाणी व्यवस्थापन रु. ७५ हजार ग्रामपंचायत, (जवळगाव, ता. हिमायतनगर, जि. नांदेड), विशेष पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता रु. ७५ हजार (सिकंदरपूर, ता. जि. लातूर), विशेष पुरस्कार स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार शौचालय रु. ७५ हजार ग्रामपंचायत, (रामपुरी बु., ता. मानवत, जि. परभणी) या सर्वांना धनादेश व प्रमाणपत्र यांचे विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com