Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना त्रास दिल्यास घरी पाठवीन..., भरबैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांला फडणवीसांचा फोन

Mahavitaran meeting : मराठवाड्यात पावसाचा खंड पडल्याने एेन पावसाळ्यात पिकांना पाणी द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याच्या तक्रार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यानंतर फडणवीसांनी थेट महावितरणच्या बैठकीत अधिकाऱ्याला कारवाईचा इशारा दिला.
mscb meeting
mscb meetingAgrowon
Published on
Updated on

Latur News : सध्या मराठवाड्यात माॅन्सूनच्या पावसाने (Rain)पाठ फिरवली आहे. मराठवाड्यात खरीप हंगामाची पिके वाया गेली आहेत. काही ठिकाणी शेतकरी पाणी देऊन पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अशी तक्रार औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महावितरणच्या बैठकीतून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) केली. शेतकऱ्यांना त्रास दिल्यास घरी पाठवीन, असा फडणवीसांनी महावितरणाच्या अधिकाऱ्याला फोनवरून इशारा दिला.

mscb meeting
Bullock Cart Race : पुणे जिल्ह्यात बैल गाडा शर्यतीवर बंदी ; जिल्हा प्रशासनाचे आदेश

लातूर जिल्ह्यात पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यांना जगवण्यासाठी शेतकरी विहिरी किंवा बोअरवेलच्या पाणी देत आहेत. पण, अनेक ठिकाणी अनियमित वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्ररात्र जाऊन पाणी द्यावे लागत आहेत. अनेक ठिकाणी नवीन डीपीची मागणी होत आहे. परंतु ती दिली जात नाही. तसेच एकाच डीपीवर लोड असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.

mscb meeting
Maharashtra Drought : महाराष्ट्राला दुष्काळाचा मोठा फटका बसणार; कृषी खात्याकडून कबुली?

गुरुवारी औसा, जि. लातूर येथे महावितरणची बैठक झाली. या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. त्यानंतर संतप्त झालेल्या अभिमन्यू पवार यांनी थेट ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला. त्यांना लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या.

त्यानंतर फडणवीसांनी फोनवरच भर बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना झापले. पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत त्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरज आहे. पिकं जगवण्यासाठी विहिरीचे पाणी द्यावे लागत आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करा. उच्च दाबाने अखंडित वीजपुरवठा करण्यासंदर्भात तसेच बिघडलेले डीपी वेळेवर दुरुस्त करा, अशा सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. नाहीतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करीन, अशा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बैठकीला मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, निलंगा येथील अभियंता श्री जाधव, उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कोरडे, तहसीलदार श्री भरत सूर्यवंशी, सरपंच, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com