Jagdeep Dhankhar : 'शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं का पाळली जात नाहीत?', उपराष्ट्रपती धनखड यांचा केंद्रीय कृषीमंत्र्यासह केंद्राला सवाल

Dhankhar criticizes Centre and Agriculture Minister on farmer issues : राजा महेंद्र प्रताप यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी थेट शेतकऱ्यांवरून सरकारलाच सवाल केला. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.
Vice President Jagdeep Dhankharad
Vice President Jagdeep DhankharadAgrowon
Published on
Updated on

Pune News : आपल्याकडे भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) सारख्या महत्त्वाच्या संस्था असूनही, शेतकरी अडचणीत आणि वेदनांमध्ये का आहे? त्यांना दिलेली आश्वासनं का पाळली जात नाहीत? असा सवाल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केंद्र सरकारला केला आहे. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. धनखड यांनी राजा महेंद्र प्रताप यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंगळवारी (ता. ३) शेतकऱ्यांच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य केले.

उपराष्ट्रपती धनखड यांनी, देशातील शेतकऱ्यांचे महत्त्व पटवून देताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे दरवाजे २४ तास उघडे असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या राष्ट्रीय विकासाच्या प्रगतीतील मोठा अडथळा असून त्या सोडवल्या पाहिजेत. आताही शेतकरी त्यांच्या मागण्यांवरून आंदोलन करत आहेत. त्यांच्या या मागण्या? प्रश्न का सोडवले जात नाहीत.

Vice President Jagdeep Dhankharad
जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

गेल्या वर्षीही शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या वर्षीही आंदोलन केले जात आहे. शेतकरी संकटात असून तो आंदोलनाचा मार्ग अवलंबत आहे. अशी परिस्थिती देशाच्या सर्वांगीण हितासाठी चांगली नाही. यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चा आणि संवादाला चालना देण्याची गरज आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला हवेत. त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणे गरजेचे असल्याचेही मत उपराष्ट्रपती धनखड यांनी व्यक्त केले आहे.

आम्ही विश्वासघात तर करत नाही

यावेळी उपराष्ट्रपती धनखड यांनी, आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपण स्वकीयांशी तर लढत नाही ना?, आपण आपल्याच लोकांशी दगाबाजी करत नाही. फसवणूक शत्रूसाठी असते आपल्या स्वकीयांसाठी नाही. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसताना कोण कसे शांत झोपू शकतो असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी त्यांनी 'आपल्याला आपल्या लोकांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपायांसाठी दरवाजे खुले केली पाहिजेत. हा देश जसा आपला आहे. देशावर ग्रामीण भागाचा प्रभाव असून मी शेतकऱ्यांशी सर्वाधिक जोडला गेलो आहे. माझे सर्वात अनुभवी सहकारीही शेतकऱ्यांशी जोडले गेले असून त शेतकऱ्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा संगम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जे झालं ते झालं, पण आता...

यावेळी उपराष्ट्रपती धनखड यांनी, जे झालं ते झालं. पण आता आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्ग योग्य असला पाहिजे. शेतकऱ्यांच्या भूमीतून विकसित भारत निर्माण झाला आहे. विकसित भारताचा प्रवास शेतातून सुरू होतो. शेतकऱ्यांचे प्रश्न जलदगतीने सोडवावेत. शेतकरी त्रस्त असला तर देशाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसतो. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपले दरवाजे २४ तास खुले राहिले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Vice President Jagdeep Dhankharad
Indian Agriculture : देशाच्या विकास दरवाढीत कृषी क्षेत्राचे योगदान मोठे ः उपराष्ट्रपती

विरोधकांवर निशाणा साधला

विरोधकांनीही आता नुसती वक्तव्ये करून शेतकऱ्यांचे समाधान करू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता ठोस उपाय करताना धोरण आणि अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आर्थिक वाढ, पायाभूत सुविधांचा विकास आणि जागतिक प्रतिमा सुधारताना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही उपराष्ट्रपती धनखड यांनी म्हटले आहे.

शेतकरी या देशाचा आत्मा : केंद्रीय कृषिमंत्री

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, भारत शेतकऱ्यांना सोडून कधीच विकसीत राष्ट्र होवू शकत नाही. आजचा गौरवशाली आणि समृद्ध भारत हा शेतकऱ्यांमुळे उभा आहे. शेती भारताचा आर्थिक कना असून शेतकरी या देशाचा आत्मा आहे. सीआयआरसीओटी देशातील अशी एकमात्र संस्था असून जी कापसाच्या उत्तम दर्जाचे बियाणे विकसित करण्यात गुंतलेली आहे. हे बियाणे स्वस्त दरात बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. यासोबतच कापूस उत्पादन वाढवण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी हवामान अनुकूल आणि कीटक प्रतिरोधक बियाणे तयार करण्यावरही आमच्या सरकारने भर दिला आहे.

ते म्हणाले की, कापूस बियाणे खूप महाग आहे. खासगी कंपन्या शेतकऱ्यांना महागडे बियाणे पुरवतात. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे कमी किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी आयसीएआरने प्रयत्न करावेत. शेतकऱ्याकडेही लक्ष द्या जेणे करून त्याला कापूस लागवडीचा फायदा मिळू शकेल आणि तो शेतीतून आपली उपजीविका योग्य प्रकारे करू शकेल असेही कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com