Department of Public Works : बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यात विकास कामांना गती

Ravindra Chavhan : राज्यात बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात येत, असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच माळशिरस येथे केले.
Development Works
Development WorksAgrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्यातील प्रलंबित असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांना मागील दीड वर्षात निधी उपलब्ध करून दिला आणि ही कामेही वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असून, राज्यात बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात येत, असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच माळशिरस येथे केले.

शासकीय विश्रामगृह माळशिरस येथील नवीन इमारतीच्या भूमिपूजन व कळंबोली- नातेपुते- शिंगणापूर या रस्त्याचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच माळशिरस येथे बांधण्यात येत असलेल्या अद्ययावत व प्रशस्त अशा नव्या न्यायालय इमारतीची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता सुनीता पाटील आदी उपस्थित होते.

Development Works
Amravati Development : अमरावतीतील ४८३ टंचाईग्रस्त गावांसाठी १२ कोटींचा आराखडा

मंत्री चव्हाण म्हणाले, की माळशिरस तालुक्याला रस्ता सुधारणा, नवीन रस्ता करणे आदी विकास कामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. तालुक्याच्या विकासासाठी यापुढेही निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल.

Development Works
Village Development : सरपंचांनो, गावाच्या विकासाचे शिल्पकार व्हा !

माळशिरस येथील विविध न्यायालयांचे कामकाज एकत्रित व सोईस्कररीत्या व्हावे, यासाठी येथे अद्ययावत व प्रशस्त अशी नवीन न्यायालय इमारत बांधण्यात येत आहे. न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व सुविधापुरक इमारत बांधण्यात येत असून, या इमारतीमुळे तालुक्याच्या वैभवात भर पडणार पडणार असल्याचे बांधकाम मंत्री चव्हाण यांनी सांगितले. आमदार मोहिते पाटील, आमदार राम सातपुते यांचीही भाषणे झाली.

माळशिरसला ३५० कोटी रुपये

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, प्रधानमंत्री सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत आहेत. माळशिरस तालुक्यातही विविध विकासासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहितीही यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com