Farmers Co-operative Societies : छ. संभाजीनगर मधील डबघाईत गेलेली सहकारी संस्था विकण्याचे सरकारचे आदेश

Farmers Cooperative Society In Ch Sambhajinagar : राज्य सरकारमधील सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाने छ. संभाजीनगर मधील शेतकरी सहकारी संस्था विकून शासनाची थकीत रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.
Mantralaya
MantralayaAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील अनेक सहकारी संस्था आर्थिक डबघाई आल्या आहेत. तर थकीत रक्कमेपोटी त्या संस्थांचा लिलाव करून आलेली रक्कम जमा करण्याचे आदेश शासनाने दिल्याचेही अनेकदा उघड झाले आहे. आता छ. संभाजीनगर मधील शेतकरी सहकारी संस्था विकून शासनाची थकीत रक्कम भरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. याबाबत सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाने सोमवारी (ता. ०८) शासन आदेश काढला आहे. तर जयकिसान भाजीपाला व फळे उत्पादित शेतकरी सहकारी संस्था मर्या. (गट नं.३६) हर्सुलसावंगी ही विकावी असे आदेशात म्हटले आहे.

जयकिसान भाजीपाला व फळे उत्पादित शेतकरी सहकारी संस्थेवर शासनाचे थकीत कर्ज आहे. तर सध्या ही संस्था आर्थिक डबघाई गेली असून ती अवसायनात गेली आहे.

Mantralaya
State Co operative Bank : राज्य सहकारी बँकेचे दोन निर्णय, साखर कारखानदारी अडचणीत; काय आहेत निर्णय

यामुळे शासनाने संस्थेची मालमत्ता विकून येणाऱ्या रक्कमेतून शासनाची देय रक्कम जमा करण्यात यावी असे म्हटले आहे. तसेच यासाठी वित्त विभाग आणि महालेखाकार - १ मुंबई यांच्या मान्यतेने नवीन खाते उघडण्याचे आदेश दिले आहे. 

याबाबत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छ. संभाजीनगर आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छ. संभाजीनगर यांच्यासह जयकिसान भाजीपाला व फळे उत्पादित शेतकरी सहकारी संस्थेला या आदेशाची प्रत पाठवण्यात आली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com