Water Conservation: गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा निर्धार; जलसाक्षरतेचा नवा संकल्प!

Water Awareness Campaign: यशदाच्या जलसाक्षरता केंद्रातर्फे महाराष्ट्रातील गावांना जलस्वयंपूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. लोकजागृतीसाठी जलनायक, जलयोद्धा आणि जलप्रेमी यांच्या माध्यमातून राज्यभर अभियान राबवले जात आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

Pune News: जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून राज्यभर जलसाक्षरता चळवळीचा लोकजागर करण्यात येऊन सर्व गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला. आपलेपणाची भावना या जाणिवेसह पाणी वापर कर्त्यांची जबाबदारी, कर्तव्य व जागरूकता करण्यासाठी जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक या स्वयंस्फूर्त फळीद्वारे लोकजागराचे आव्हानात्मक काम यशदातील जलसाक्षरता केंद्रातर्फे करण्यात येत आहे, असे मत यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.

राज्यातील जलसाक्षरता उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी यशदा येथे गुरुवारी नाशिक महसूल विभागातील जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक व जलकर्मीं प्रशिक्षकांची एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली. जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

Water Conservation
Water Conservation : गावासाठी सरपंच ‘पाणीदार’ हवा...

यावेळी वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेचे संचालक गोवर्धन कुलकर्णी, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, जलकर्मी लक्ष्मीकांत वाघवकर, हनुमंत देशमुख, जलनायक रमाकांतबापू कुलकर्णी, यशदाचे वसंत राजूरकर, वाघाड कालवा उपविभागाचे सहाय्यक अभियंता निलेश वन्नेरे, अहिल्यानगरचे जलप्रेमी सुखदेव फुलारी, संतोष दहीफळे आदी उपस्थित होते.

श्री. कलशेट्टी म्हणाले, की जलसाक्षरता चळवळीतून पाण्याचा कार्यक्षम, काटकसरीने व समन्यायी असा सुयोग्य वापर करण्यासाठी लोकप्रबोधन, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन व संवर्धन, निर्मित सिंचन क्षमतेचा प्रभावी वापर, पाणी हक्क, धरण, कालव्याबाबत आपलेपणाची भावना तयार होण्याची गरज आहे. तसेच पाण्याचा ताळेबंद करून प्रत्येकांनी एक गाव दत्तक घेतले पाहिजे. तरच पाण्याचा वापर योग्य पद्धतीने होण्यास मदत होईल.

Water Conservation
Water Conservation Project: जलसंधारण प्रकल्पांच्या देखभाल, दुरुस्तीकरिता नवीन धोरण आणणार

पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत म्हणाले की, विभागातील पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामध्ये तिसगाव प्रकल्पावरील उपसा पाणी वापर संस्थांना अल्ट्रासोनिक मिटर बसविण्याची धडक मोहीम सुरू केली. तसेच शासनाचे निर्णयानुसार पाणी वापर संस्थांचे दप्तराची तपासणी देखील सुरु करून त्यातील त्रुटी पाणी वापर संस्थांना कळवून त्याची पूर्तता करुन घेण्यात येत आहे.

पाणी वापर संस्था सक्षम करावयाच्या असतील तर शासन व लाभधारक यांचा समन्वय करणे, सिंचन विभागावर जास्त लक्ष केंद्रित करणे, अभियंताच्या जास्तीत जास्त सहभाग वाढविणे, वाघाडच्या धर्तीवर उर्वरित प्रकल्पावर धडाडीने पाणी वापर संस्था स्थापन करण्याची मोहीम हाती घेणे, पाणी वापर संस्था पदाधिकारी, सचिव प्रशिक्षण, वाल्मी, मेटा, यशदा या सारख्या संस्थामध्ये चर्चासत्र, प्रशिक्षणाबाबत मोहीम आखणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com