Crop Management: अतिवृष्टी आणि पावसाच्या सततच्या धारेमुळे राज्यातील अनेक भागांत सोयाबीनची उत्पादकता घसरली असतानाच नागपूर जिल्ह्यातील येरणगाव येथील शेतकरी राजेश राठोड यांनी शास्त्रोक्त व्यवस्थापनाचा अवलंब करून हेक्टरी तब्बल २० क्विंटल उत्पादन घेण्यात यश मिळविल्याचा दावा केला आहे.