Sugarcane Rate : महामार्गावर शेतकरी एकवटले, कोल्हापूरात आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न

Sugarcane Farmers Protest : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात अनेक मार्ग बंद करण्यात आल्यानं रस्त्यांवर रहदारीच्या रुपानं त्याचे परिणाम दिसून येत आहेत.
swabhimani shetkari sanghatana
swabhimani shetkari sanghatanaAgrowon

Kolhapur Chakka Jam Live Updates : साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी गाळप केलेल्या ऊसाला दुसरा हप्ता जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो शेतकरी पुणे-बेंगलोर महामार्गावरील चक्का जाम करण्यासाठी शिरोली नाक्यावर एकवटले आहे. परंतु, पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग उभारत रस्ते बंद करून आंदोलकांचा मार्ग रोखून धरला आहे.

swabhimani shetkari sanghatana
Sugarcane FRP : सहकारमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, दुसऱ्या हप्त्यासाठी राजू शेट्टींचा कारखान्यांसह प्रशासनाला इशारा

साखर कारखान्यांच्या मागील हंगामात गाळप केलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये देण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. मात्र, कारखानदारांकडून सकारात्मक भूमिका न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर अनेक ठिकाणी ऊस आणि साखर वाहतूक रोखण्यात आली. ऊस दरावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून बैठका घेण्यात आल्या.

त्यानंतर काल मुंबईत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला ४०० ऐवजी किमान १०० रुपये तरी द्यावेत, अशी आग्रही भूमिका घेतली. मात्र, ही बैठकही निष्फळ ठरल्याने आजपासून पुणे-बेंगलोर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

swabhimani shetkari sanghatana
Sugarcane Rate : कोल्हापुरात ऊसदरावरून असंतोष

त्यामुळे कालपासूनच कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून तळंदगे फाटा-हातकणंगले-जयसिंगपूर-इस्लामपूर-पेठ नाका येथून पुण्याकडे जाण्यास वाहतूक वळवली आहे. तर कोल्हापुरातून बेळगाव कडे जाण्यासाठी सीए कसबा बावडा-कोल्हापूर शहर शिवाजी विद्यापीठ मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

पोलिसांचा शिरोली नाक्यावर प्रचंड फौज फाटा तैनात केला आहे. त्यामुळे शिरोली पुलावर पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाल आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग उभारत रस्ते बंद करून आंदोलकांचा मार्ग रोखून धरला आहे. परंतु मोठ्या संख्येने शेतकरी महामार्गावर जमत आहेत. अनेक मार्ग बंद करण्यात आल्यानं रस्त्यांवर रहदारीच्या रुपानं त्याचे परिणाम दिसून येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग वर मोठ्या प्रमाणात ट्राफिक दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com