Ajit Pawar : 'काढा पद यात्रा! आता उत्साह आलाय?', अजित पवार यांची कोल्हे यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले, पाडणार म्हणजे पाडणार!

Ajit Pawar On MP Amol Kolhe : अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांना आपण लोकसभा निवडणूकीत पाडणार म्हणजे पाडणार असे म्हटले आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांचा गट हा सरकारमध्ये सामिल झाला आहे. यावेळी पुण्यात अजित पवार यांनी सोमवारी (२५ रोजी) खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार यांनी, 'कोल्हे यांना निवडूण आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी हाडाची काडं केलीत. मी त्यांना तिकीट दिलं. पण आता त्यांना उत्साह आला आहे. ते पदयात्रा काढत आहेत', अशी टीका केली आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दोन खासदारांकडून मोर्चे आणि रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावरून अजित पवार यांनी ही टीका केली आहे. तसेच, कोल्हे यांनी जर पाच वर्षात मतदार संघात लक्ष घातले असते तर ही वेळ आली नसती अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी अमित शहा यांची भेट घेणार : अजित पवार

जीवाचं रान केलं

अजित पवार यांनी कोल्हे यांच्यावर टीका करताना, 'त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केले आहे. उमेदवारी मी दिली आहे. पण आता निवडणुका जवळ आल्याने कोल्हे यांना उत्साह आला आहे. ते पदयात्रा काढत आहेत. पण गेल्या पाच वर्षात ते मतदारसंघात फिरत नव्हते'.

Ajit Pawar
Shasan Aplya Dari : भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवार यांच्या भाषणावेळी अचानक गोंधळ

ते म्हणत होते, 'राजीनामा देतोय. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर, प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होत आहे. पण आता त्यांचे सगळ योग्य चाललयं. काढा पदयात्रा, मी सुद्धा सहा तालुक्यांमध्ये सांगतो, गेल्या पाच वर्षांत यांची भूमिका काय होती?

निवडून आणून दाखवतो

यावेळी, 'आपण दिलेली उमेदवारी योग्य होती. पण आता त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. ते नक्कीच उत्तम कलाकार आहेत. त्यांचे वत्कृत्त्व चांगले असून ते उत्तम वक्ते आहेत. संभाजी महाराजांची भूमिकाही त्यांनी उत्तम साकारली. पण आता काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, मी निवडून आणणार, त्याला पाडणार म्हणजे पाडणार! असे देखील अजित पवार यांनी इशारा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com