Kartiki Ekadashi : विठ्ठरायाच्या शासकीय महापूजेनंतर देवेंद्र फडणवीसांचं साकडं

Devendra Fadnavis : कार्तिकी एकादशीनिमित्त आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे श्री विठुराया आणि रखुमाईची सपत्नीक शासकीय पूजा करण्यात आली.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisAgrowon

Pandharpur News : कार्तिकी एकादशीनिमित्त आज गुरुवार (दि.२३) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल- रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन घुगे दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला.

पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. परंतु यंदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाकडून पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीला विरोध दर्शविला होता. दरम्यान, शासनाच्यावतीने आंदोलकांशी चर्चा झाल्यानंतर विरोध मावळला. कार्तिकी एकादशीची पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पंढरपूरात दाखल झाले. यावेळी वारकऱ्यांसोबत फुगडी आणि टाळ घोषात दंग झाले.

Devendra Fadnavis
Sugarcane Rate : कोल्हापुरात ऊसदरावरून असंतोष

कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरात राज्यभरातील वारकरी जमले आहे. टाळ, मृदंगांचा गजर आणि विठू नामाच्या गजरात अवघी पंढरी दुमदुमूली आहे. गुरुवारी पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. 'महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, शेतकऱ्यावरील संकट दूर व्हावं, पावसामुळं चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर व समाधान देण्याची शक्ती विठुरायानं आम्हाला द्यावी, अशी प्रार्थना विठुरायाकडं केल्याचं फडणवीसांनी सांगितले.

यंदा मानकरी वारकरी म्हणून बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला. घुगे दाम्पत्य गेल्या १५ वर्षांपासून पंढरीची वारी करीत आहेत.महापूजेनंतर तात्काळ विठ्ठल दर्शनास सुरुवात झाली. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पूजनेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिर समितीकडे विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाचे‌ भूमिपूजन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com