Sugarcane Rate : कोल्हापुरात ऊसदरावरून असंतोष

Swabhimani Shetkar Sanghatna Protest : ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी मुंबईत साखर कारखानदार व शेतकरी संघटनांमध्ये बैठक निष्‍फळ झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज (ता.२३) सकाळीपासून चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
Kolhapur Protest
Kolhapur ProtestAgrowon

Kolhapur News : गतवर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये आणि या वर्षीच्या उसाला ३५०० पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी जिल्ह्यास विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात बुधवारी (ता. २२) सायंकाळपर्यंत असंतोष कायम राहिला.

Kolhapur Protest
Sugarcane Rate Protest : राजू शेट्टींची आरपारची लढाई, ऊस दरासाठी बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोखणार

मुंबईतील कारखानदार व शेतकरी संघटनांमध्ये बैठक निष्‍फळ झाल्यानंतर पुन्‍हा अस्वस्थता पसरली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे कोल्हापुरातूनच ऑनलाइन सहभागी झाले. तोडगा निघण्‍याच्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत कोणतेच घटक न आल्याने गुंता कायम राहिला.

दरम्यान, शेतकरी संघटनेकडून चक्का जाम आंदोलनाची तयारी करण्यात येत होती. आज (ता.२३) सकाळी अकरापासून आंदोलनास प्रारंभ होणार आहे. चक्का जाम आंदोलन बेमुदत काळासाठी असल्याने संघटनेने लोकवर्गणीतून आंदोलनाच्या खर्चाची तयारी केली आहे.

आंदोलन लांबण्याची शक्यता गृहित धरून महामार्गावरच जेवण बनवून तेथेच पंगती बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांकडूनही हे आंदोलन रोखण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी नाका बंदी करून त्या त्या ठिकाणीच कार्यकर्त्यांना अडविण्याचे नियोजन पोलिसांकडून सुरू होते.

Kolhapur Protest
Sugarcane FRP : सहकारमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, दुसऱ्या हप्त्यासाठी राजू शेट्टींचा कारखान्यांसह प्रशासनाला इशारा

शिरोळमध्ये संघर्ष

दरम्‍यान, शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर कारखाने सुरू करावेत, या साठी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. याला विरोध करण्याकरिता पक्ष व संघटनाविरहीत असणाऱ्या युवा शेतकऱ्‍यांनी हक्काचा दर मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, अशी मागणी करत जोरदार मोर्चा काढला.

हा मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे येत असताना कृती समिती व युवा शेतकऱ्यांत संघर्ष टाळण्यासाठी हा मोर्चा जयभवानी चौकात अडविला. तिथे शेतकऱ्यांची भाषणे झाली. कृती समितीने दोन दिवसांत प्रश्न मिटला नाही तर आम्ही पोलिस बंदोबस्तात तोडी सुरू करू, असे निवेदन तहसिलदारांना दिले.

‘गेल्या हंगामाचे किमान १०० रुपये द्या’

राजू शेट्टी म्हणाले, ‘‘कारखानदार गेल्या वर्षीचा हप्ता किमान १०० रुपयांपर्यंत देणार नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही. आम्ही तीन पाऊले मागे आलो आहोत, तुम्ही एक पाऊल तरी पुढे या. कारखान्यांनी ताठर भूमिका घेतली तर आंदोलन अटळ आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com