Employment Fair : शेगावात उद्या विभागीय रोजगार मेळावा

Organization of Employment Fair : शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
Job Fair
Job FairAgrowon

Akola News : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय (शेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शुक्रवारी (ता. दोन) शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मेळाव्यात विविध क्षेत्रातील २३ कंपन्या, उद्योगसमूह, कारखान्यांच्या आस्थापनेवरील सुमारे १२२७ कुशल, अकुशल रिक्त पदांसाठी रोजगारभरती होणार आहे. चा अमरावती विभागातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता उपायुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

Job Fair
Union Budget 2024 : पंतप्रधान आवास योजनेतून २ कोटी घरं बांधणार ; अर्थमंत्र्यांची घोषणा

या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यात जीनस इन्फ्रा प्रा.लि., पीपल ट्री व्हेंचर प्रा.लि., एजीएस इंशुरन्स, पेटीएम, जाधव ग्रुप ऑफ कंपनी, लक्ष्मी अग्णी कंपनी प्रा.लि.,सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी, नवभारत फर्टीलायझर, टॅलेनसेतू ,सीएजीएल, एलआयसी.

कल्पतरु स्कील डेव्हलपमेंट अकॅडमी, इलेगन्ट कोटिंग, हेंड मोटर्स एल.एस., पीएनबी मेटलाईफ इंडिया इंशुनन्स, पियाजिओ व्हिकल्स, अलाईड रिसोस मॅनेजमेंन्ट सर्विस, धुत ट्रान्समिशन , टॅलेंट सेतू, परम स्किल ट्रेनिंग इंडिया आदी २३ नामांकित कंपन्यामार्फत रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Job Fair
Interim Budget 2024 News LIVE: यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय? संपदा योजनेचा ३८ लाख शेतकऱ्यांना लाभ

या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, इंजिनीअरींग, पदवी, पदव्युत्तर, पदविका तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखती देऊन रोजगाराचा लाभ घेता येईल.

अमरावती विभागातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळावा मधून नोकरी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी (प्लेसमेंट ड्राईव्ह) http://surl.li/mbrkg या लिंकवर जाऊन नि:शुल्क ऑनलाइन नोंदणी करावी. किंवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळाला भेट देवून नि:शुल्क ऑनलाइन नोंदणी करावी.

इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी संत गजानन महाराज अंभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव (जि. बुलडाणा) येथे स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांसह (ऑनलाइन सेवायोजन कार्ड, निवडणूक ओळखपत्र/आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, दोन पासपोर्ट फोटो, बायोडाटा व इतर आवश्यक साहित्यासह) रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com