Interim Budget 2024 News LIVE: यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय? संपदा योजनेचा ३८ लाख शेतकऱ्यांना लाभ

Budget 2024 News : यंदाचे बजेट सादर करताना निर्मला सितारामन यांनी शेतीविषयक उद्योगावर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.
Interim Budget 2024 News LIVE
Interim Budget 2024 News LIVEagrowon
Published on
Updated on

Interim Budget 2024 News LIVE : यंदाचे बजेट सादर करताना निर्मला सितारामन यांनी शेतीविषयक उद्योगावर भर देण्याचा प्रयत्न केला आहे. बजेटमध्ये त्यांनी दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची योजना आखली जाईल. तसेच तेलबियांमध्ये स्वावलंबी होण्यासाठी धोरण आखले जाईल.

वेगवान विकासासाठी नवीन आर्थिक धोरणे आखली जात आहेत. ३८ लाख शेतकऱ्यांना पीएम संपदा योजनेचा लाभ झाला आहे. पीएम मत्स्य योजना ५५ लाख नवीन नोकऱ्या देणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.

सौरऊर्जा आणि गरीबांच्या घरांवर सरकारचे लक्ष

कोविडचे आव्हान असतानाही केंद्र सरकारने गरिबांना घरे दिली. ३ कोटी घरांचे उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ आहोत. पुढील ५ वर्षांत आणखी २ कोटी घरे बांधली जातील. छतावरील सौरऊर्जेसाठी १ कोटी घरांवर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा प्रसंगी पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली होती त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत.

लखपती दीदी योजना

सितारामन म्हणाल्या की, सुमारे एक कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. सध्या २ कोटी लखपती दीदींचे टार्गेट ३ कोटी करण्यात येत आहे. महिलांच्या विकासावर आपले सरकार विशेष लक्ष देत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. लखपती दीदी याचाच एक भाग आहे.

Interim Budget 2024 News LIVE
Interim Budget 2024 : २०४७ पर्यंत देश विकसित, ८० कोटी लोकांना मोफत रेशन, निर्मला सितारामन यांचं बजेट LIVE

पुढील ५ वर्षे देशाच्या उन्नतीची

निर्मला सितारामन म्हणाल्या की कोविड नंतर एक नवीन जागतिक व्यवस्था तयार झाली आहे. अत्यंत कठीण काळात भारताने G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले. कमी विकास दर आणि हवामान बदल यासारख्या समस्यांशी जग झगडत होते. तर या सर्व गोष्टींना न जुमानता भारत आपली वाटचाल करण्यात यशस्वी झाला. भारत-मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर ही एक मोठी उपलब्धी आहे. या कॉरिडॉरमुळे व्यवसाय वाढणार आहे. सर्वांच्या विश्वासातून पुढील ५ वर्षे विकासाची गंगा वाढणार आहे.

महिला आरक्षणाच्या माध्यमातून जीडीपीचा उल्लेख

सरकार प्रशासन, विकास आणि कामगिरीवर भर देत आहे. मोदी सरकार सिटीझन फर्स्टकडे लक्ष देत आहे. महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्यात आले आहे. देशाची अर्थव्यवस्था चांगली चालली आहे. देशातील जनता चांगली कमाई करत आहे. योजनांची वेळेवर अंमलबजावणी होत आहे.

मोदी सरकारचे शैक्षणिक क्षेत्रातील यश

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने ३ हजार नवीन आयटीआय, ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम, १५ एम्स आणि ३९० विद्यापीठे स्थापन केली आहेत. सरकारच्या या योजनांद्वारे खूप बदल झाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी सरकारचे काम

पीएम पीक विमा योजनेतून ४ कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात आला. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी खूप काम करत आहे. २०१४ मोठी आव्हाने होती. असेही त्या म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com