Agriculture Development : ‘कृषी’साठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम

Agricultural Activity : शरद पवार यांच्या हस्ते प्रारंभ; ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा उपक्रम
The Agricultural Development Trust gets the Oxford platform
The Agricultural Development Trust gets the Oxford platformAgrowon

Pune News : बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संस्थांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज’ असा जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम तयार केला असून, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २६) या अभ्यासक्रमाचा प्रारंभ झाला.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्‍वस्त प्रतापराव पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, ‘क्लिक टू क्लाउड’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिश्रा, इन्नोसेपियन ॲग्रो टेक्नॉलॉजिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सारंग नेरकर, माजी कुलगुरू शंकरराव मगर, ‘व्हीएसआय’चे सल्लागार शिवाजीराव देशमुख व महासंचालक संभाजी कडू पाटील उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरातून बारामतीमध्ये ‘सेंटर फॉर एक्सलन्स फार्म व्हाइब्ज प्रकल्प’ सुरू होत आहे. त्याचा प्रारंभ जानेवारीत बारामतीच्या कृषिक प्रदर्शनात होईल. त्याचबरोबर ऊस उत्पादनात गेम चेंजर ठरणाऱ्या तंत्राबाबत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट एकत्र आले आहेत. या विविध प्रकल्पांबाबत संबंधित संस्थांच्या उच्चपदस्थांनी श्री. पवार यांच्यासमोर या वेळी सादरीकरण केले.

पत्रकारांशी बोलताना श्री. पवार यांनी कृषी क्षेत्रात भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेला अनन्यसाधारण महत्त्व राहणार असल्याचे विषद केले. ते म्हणाले, ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेला कृषी क्षेत्रात आणण्यासाठी व हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत कसे नेता येईल यासाठी आम्ही पावले टाकत आहोत.

त्यासाठी बिल गेट्‍स फाउंडेशन, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड अशा जागतिक दर्जाच्या संस्था एकत्र येत आहेत. याच तंत्राच्या माध्यमातून उसातील साखर उतारा वाढविण्याचा प्रयत्न राहील.’’

The Agricultural Development Trust gets the Oxford platform
PM Modi in Shirdi : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?, मोदींचा सवाल

काटेकोर शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाला अभ्यासक्रमात आणताना मुख्यतः वातावरणातील बदल व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम यावर भर दिला जाणार आहे. ‘ऑक्सफर्ड’तर्फे त्यासाठी डॉ. अजित जावकर व डॉ. अलेक्झांडर मोलक काम पाहणार आहेत.

कृषी, तंत्रज्ञान, हवामान बदल, अन्न साखळी क्षेत्रातील युवक, आयटी व संगणक अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊ शकतील.

या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास शेतकरी खत, पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन सुयोग्य करू शकतील. कीड व रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्तावाढ, काढणीपश्‍चात तंत्रासाठीही या तंत्राचा वापर करता येईल.

याशिवाय उत्पादनाचा अंदाज, हवामान बदलानुसार पीक पद्धतीचे नियोजन, बाजारभावाचा अंदाज बांधणे, जमिनीची उत्पादकता वाढवणे, मातीची गुणवत्ता वाढवणे, रासायनिक खतांचा कमी वापर करण्यासाठी या तंत्रात सेन्सर, ड्रोन, रोबोट व उपग्रहाची मदत घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांना त्याचे प्रात्यक्षिक १८ ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान भरणाऱ्या ‘कृषिक’ या कृषी प्रदर्शनात पाहता येईल.

The Agricultural Development Trust gets the Oxford platform
Village Development : शाश्‍वत विकासाचा आराखडा तयार करा...

ऊस शेतीसाठी नवतंत्रज्ञानाचे वरदान

व्हीएसआय व ट्रस्टच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत होणाऱ्या संशोधनामुळे उसासाठी खत व पाणी व्यवस्थापनात सेन्सर, उपग्रहाचा वापर वाढणार आहे. या तंत्राने उसाची उत्पादकता वाढ. जमीन पोत सुधारणा व खतांचा मर्यादित वापर शक्य आहे. तसेच क्षारयुक्त जमिनीतूनही शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतील.

कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वापरता येईल यासाठी जगविख्यात संस्थांच्या माध्यमातून ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये विविध उपक्रम राबवत आहे. त्यातून होणारे प्रयोग छोट्या शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरतील. यात आम्ही गावस्तरापासून जागतिक पातळीपर्यंत जाण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
प्रतापराव पवार, विश्‍वस्त, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट
कृत्रिम बुद्धिमत्तेभोवती जग केंद्रित होते आहे. त्याचा वापर शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आमचे संशोधन, तंत्र व संकल्पना प्रत्यक्षात कसे कार्य करतील हे येत्या कृषिक प्रदर्शनात सर्वांना बघण्यास मिळणार आहे.
डॉ. अजित जावकर, संचालक, ऑक्सफर्ड विद्यापीठ
जगभरात उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान केवळ बारामती नव्हे, तर देशभरातील शेतकऱ्यांच्या दारात नेण्याचे आमचे प्रयत्न आहेत. या तंत्र वापराचे माध्यम सहज सोपे असावे व ते प्रादेशिक भाषांमधून उपलब्ध व्हावे, असे आमचे उद्दिष्ट आहे.
प्रशांत मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, क्लिक टू क्लाउड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com