Farmers Producer Company Opportunity : शेतकरी उत्पादक कंपन्यांना तरंग मेळ्यातून नवीन संधी

Tarang Mela : नाशिक येथे ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान ‘नाबार्ड’ एफपीओ तरंग मेळा व शेतकरी उत्पादक कंपनीनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन नुकतेच झाले.
Tarang Mela
Tarang MelaAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक येथे ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान ‘नाबार्ड’ एफपीओ तरंग मेळा व शेतकरी उत्पादक कंपनीनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन नुकतेच झाले. हे प्रदर्शन लघू कृषक व्यापार संघ (एसएफएसी), ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. या मेळ्यातून ४० शेतकरी उत्पादक कंपन्यांना नवीन संधी व व्यासपीठ मिळाले.

नाबार्ड व तरंग मेळ्याचे उद्‍घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालिका लिना बनसोड यांच्या हस्ते झाले. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर सी. बी. सिंघ, नाबार्डचे उप महाप्रबंधक अनिल रावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर भिवा लवाटे, विपणन अधिकारी गुलजार सोनवणे, एसएफएसीचे प्रकल्प समन्वयक गणेश साहू, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक अमोल लोहकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मेळ्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ४० स्टॉलधारक सहभागी झाले होते. या वेळी राज्यभरातील आलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांची ग्राहकांनी खरेदी केली.

Tarang Mela
Tarang FPO Mela : दर्जेदार उत्पादनाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रीची संधी

शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बँक संवाद याविषयी बँक ऑफ महाराष्ट्राचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर भिवा लवाटे यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. त्यानंतर विपणन अधिकारी गुलजार सोनवणे यांच्या हस्ते ‘योजनांचे सादरीकरण’ या विषयावर तर कृषक मित्र ॲग्रो सर्व्हिसेसचे संजय जोशी यांच्यातर्फे ॲग्री स्टार्टअप सादरीकरण या विषयावर चर्चासत्र पार पडले.

Tarang Mela
Namo Employment Fair : तरूणांनी आपले भवितव्य साकारावे : मुख्यमंत्री शिंदे

मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या यशोगाथा, आव्हाने आणि अनुभव या विषयावर सावित्रीबाई फुले शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यकारी संचालिका सुवर्णा काळे, जनशांती शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास जेउघाले यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर कंपनी कायद्यासंदर्भात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अनुपालनाबाबत मार्गदर्शन या विषयावर कंपनी सचिव अनघा केतकर यांनी मार्गदर्शन केले.

समारोपाच्या दिवशी दुपारी ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कृषी विभागाच्या योजना’ या विषयावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांचे व्याख्यान झाले. अर्थ वित्त सल्लागार गणेश शिंदे यांचे ‘ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एआयएफ)’ या विषयावर मार्गदर्शन झाले. या वेळी सहभागी स्टॉलधारकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com