Sericulture : रेशीम उद्योजकांना देणार धागा निर्मितीचे प्रात्यक्षिक

Silk Production : वाशीम जिल्हयात मागील वर्षी २५ हजार ६५० अंडीपूंजापासून नऊ हजार २७० किलोग्राम रेशीम कोषांचे उत्पादन शेतकऱ्यांनी केले.
Sericulture
Sericulture Agrowon
Published on
Updated on

Washim News : जिल्ह्यात रेशीम शेती वाढत चालली आहे. जिल्ह्यातील शेतकरी तुती लागवड करीत असून त्यापासून कोष उत्पादन वाढले आहे. या पुढील टप्प्यात प्रक्रीया उद्योगाकडे उत्पादकांनी वळावे या उद्देशाने जिल्हा रेशीम विभागातर्फे ६ व ७ सप्टेंबरला धागा निर्मितीचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा रेशिम विकास अधिकारी सु. प्र. फडके यांनी दिली.

वाशीम जिल्हयात मागील वर्षी २५ हजार ६५० अंडीपूंजापासून नऊ हजार २७० किलोग्राम रेशीम कोषांचे उत्पादन शेतकऱ्यांनी केले. एक एकर क्षेत्रात प्रतिवर्षी दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न रेशीम उद्योजक घेत आहेत. कृषी आधारीत परंतु तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता असलेला हा उद्योग आहे. कृषी मालावर प्रक्रिया केल्यानंतर जास्त नफा मिळतो, त्याचप्रमाणे रेशीम कोषावर प्रक्रिया करुन रेशीमधागा निर्मिती केल्यास रेशीम सूत विक्रीपासून जास्त नफा मिळतो.

Sericulture
Sericulture Farming : काळानुसार रेशीम शेतीत केले आवश्यक बदल

अंदाजे सहा ते आठ किलोग्राम कोषापासून एक किलो रेशीम सुत तयार होते. त्यासाठी मल्टीएंड रिलींग मशीनची आवश्यकता असते. त्याची किंमत अंदाजे २० लाखांपर्यंत आहे. त्यासोबत रि-रिलींग मशीन, परमिशिअबल चेंबर, कुकींग मशीन, बॉयलर इत्यादीची आवश्यकता असते. तसेच पाणी, मजूर, वीज जोडणी इत्यादीसाठी कमीत कमी एक हजार फुट जागेची आवश्यकता असते. त्यामुळे मोठा उद्योजक असेल तरच इतके भांडवल गुंतवणूक करु शकतात.

कमी गुंतवणुकीमध्ये महिला बचत गट, शेतकरी गट/ कंपनी यांना परवडण्यासारखी एक छोटी मशीन व इतर साहित्यासह केवळ दहा बाय दहा म्हणजेच १०० ते १५० वर्गफुट जागेत हा उद्योग करता येईल, अशी रेशीम धागा निर्मिती करणारी मशीन रेशीम तयार झाली आहे. एका दिवसात १ किलो रेशीम सुत उत्पादन एक महिला करु शकते. महिला बचत गट जिल्हयातील रेशीम उद्योजकांकडून रेशीम कोष खरेदी करुन आपल्या क्षमतेप्रमाणे पाच- सहा अशा मशीन विकत घेऊन अतिशय कमी जागेत छोटा उद्योग सुरु करु शकतात.

Sericulture
Sericulture Farming : रेशीम शेती हे महिन्याला शाश्वत उत्पन्न देणारे पीक : बोराडे

अडीच लाख रूपये या मशीनची किंमत असून महिला बचत गटांना परवडणारी आहे. यामध्ये रि-रिलींग मशीन, परमिशिअबल चेंबर, कुकींग मशीन यांचा समावेश आहे. या यंत्राचे प्रात्याक्षित नागपूर येथे रेशीम संचालनालयाचे संचालक वसुमना पंत आणि उपसंचालक महेंद्र ढवळे यांना दाखवले आहे.

त्यांच्या संमतीने विदर्भातील अमरावती, वाशीम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यात प्रात्यक्षिक दाखवले जात आहे. त्यानुसार वाशीममध्ये ६ व ७ सप्टेंबर रोजी जिल्हा रेशीम कार्यालयात हे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील छोटे उद्योजक, महिला बचत गट, शेतकरी गट/कंपनी यांनी याचा लाभ घ्यावा व जिल्ह्यात उद्योग सुरु करावा, असेही श्री. फडके यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com