Sericulture Farming : रेशीम शेती हे महिन्याला शाश्वत उत्पन्न देणारे पीक : बोराडे

Silk Industry Training : हवामान बदलामुळे शेती धोक्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी नवीन पिकांचा शोध घेत आहेत. या बदलत्या हवामानात प्रत्येक महिन्याला शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम शेती पुढे येत आहे.
Silk Industry Training
Silk Industry TrainingAgrowon
Published on
Updated on

Jalna News : हवामान बदलामुळे शेती धोक्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी नवीन पिकांचा शोध घेत आहेत. या बदलत्या हवामानात प्रत्येक महिन्याला शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम शेती पुढे येत आहे, असे मत मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे सचिव विजयआण्णा बोराडे यांनी कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे पाच दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले.

या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, कृषी विज्ञान केंद्रातील किटकशास्त्रज्ञ अजय मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री बोराडे म्हणाले, की महिलांमध्ये बारकाईने काम करण्याची वृत्ती व संगोपन कौशल्य असल्यामुळे महिला रेशीम शेती चांगल्या प्रकारे करू शकतात.

Silk Industry Training
Silk Farming : बॅच नियोजनानुसार तुती पाला उपलब्धतेवर भर

रेशीम शेतीला शेततळ्याची जोड दिल्यास बाराही महिने रेशीम शेती करून शाश्वत उत्पन्न घेता येते. गावामध्ये एकट्याने रेशीम शेती करण्याऐवजी गटातून केल्यास एकमेकाला गरजेनुसार पाला वापरता येतो. तुती हे पीक इतर पिकांच्या तुलनेत आरामदायी पीक आहे. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीमध्ये प्रामाणिकपणे सातत्य ठेऊन काम केल्यास नोकरदाराप्रमाणे महिन्याला उत्पन्न काढता येते, अजय मोहिते यांनी रेशीम शेतीमधील संधी या संदर्भात मार्गदर्शन केले.

Silk Industry Training
Silk Farming : तुती रेशीम बीज दरात सुधारणा करण्याचा निर्णय

प्रास्ताविकपर भाषण डॉ. सोनुने यांनी केले. पाच दिवसामध्ये तुती रोपवाटिका तयार करणे, तुती लागवड, रेशीम किटक संगोपन, कोष काढणी इत्यादी विषयावर प्रशिक्षणार्थ्यांना बौद्धिक व प्रात्यक्षिक सत्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षानार्थींची अभ्यास सहल आयोजित करून कचरेवाडी येथील रेशीम उद्योगास भेट, पैठण येथील रेशीम साडी तयार करण्याच्या प्रकल्पास व धागा निर्मिती केंद्रास भेट देण्यात आली.

या प्रशिक्षणास जिल्ह्यातील १६ गावातून ३३ महिलांसह एकूण ५७ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किटक शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com