Sand Mafia : तलाठी, कोतवालला भररस्त्यात बेदम मारहाण; यवतमाळमध्ये वाळू माफियांची मुजोरी वाढली

Yavatmal Latest News : काहीच दिवसांपूर्वी रत्नागिरीत रोजगारी हमीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. मुरूगवाडा पांडरा समुद्र येथे मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. या घटनेला सात दिवसही उलटत नाहीत तोच आता यवतमाळ जिल्ह्यात देखील वाळू माफियांनी सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे.
Sand Mafia
Sand MafiaAgrowon

Pune News : राज्यात वाळू माफियांची मुजोरी वाढलेली दिसत असून सरकारी अधिकाऱ्यांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. काहीच दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये उपजिल्हाधिकारी असणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच आता यवतमाळ जिल्ह्यात देखील वाळू माफियांची दादागिरी उघड झाली आहे. येथे वाळू माफियांकडून तलाठी आणि कोतवालास मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील दिग्रसच्या गांधीनगर येथे घडली असून घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दिग्रस पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या राज्य शासनाने वाळूच्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागात अवैधरित्या वाळू तस्करी केली जात आहे. तर कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांवर विविध ठिकाणी वाळू माफियांकडून हल्ले होत आहेत. अनेक ठिकाणी वाळू माफियांची मुजोरी आणि दहशत समोर येत आहे. अशीच घटना यवतमाळ जिल्ह्यात समोर आली आहे.

Sand Mafia
Sand Mafia : शिंदोडी परिसरात वाळूमाफियांचा धुडगूस

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसच्या गांधीनगर येथे वाळू माफियांनी तलाठी आणि कोतवाल यांना बेदम मारहाण केली. याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. राज्यात एकीकडे अवैध रेती वाहतूक आणि उत्खनन सुरूच आहे. अशीच अवैध रेती वाहतूक दिग्रसच्या गांधीनगर परिसरात होत असल्याची माहिती तलाठी जयंत व्यवहारे व कोतवाल यांना मिळाली. त्यानंतर तलाठी व्यवहारे व कोतवाल यांनी रेतीची अवैध वाहतूक करण्यास मनाई केल्याने वाळू माफियांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरीत उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीमध्येही एका महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर अशाच प्रकारे वाळू माफियांनी हल्ला केला होता. मात्र महिला अधिकारी कराटे चॅम्पियन असल्याने त्या तेथून निसटल्या. हर्षलता गेडाम असे उपजिल्हाधिकाऱ्यांचे नाव असून त्या मुरुगवाडा-पांढरा समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्या असता त्यांच्यावर हल्ला झाला होता.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com