Electricity : येणेगूर वीज उपकेंद्रात जादा क्षमतेचे रोहित्र बसविण्याची मागणी

Rural Electricity Issue : उमरगा तालुक्यातील येणेगूर वीज उपकेंद्रातून लोहारा व उमरगा तालुक्यातील गावांना वीजपुरवठा करण्यात येतो.
Electricity Sub-Station
Electricity Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : उमरगा तालुक्यातील येणेगूर वीज उपकेंद्रातून लोहारा व उमरगा तालुक्यातील गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. केंद्रांतून गेलेल्या दोन वीजवाहिन्यांवर (फीडर) मोठ्या संख्येने गावांचा भार आहे. केंद्रात कमी क्षमतेचे रोहित्र आणि विजेचा भार जास्त असल्यामुळे एक दिवस वीज आणि दोन दिवस बंद अशी परिस्थिती आहे.

यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून, वीज केंद्रात दहा एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसवून नियमित दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मागणी पूर्ण न केल्यास वीज उपकेंद्रासमोर बेमुदत उपोषण व राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

Electricity Sub-Station
Electricity Revenue : वीजविक्रीतून महसूल १९०० कोटींवर, ऊर्जा क्षेत्रात नवा विक्रम

याबाबत येणेगूर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या दहा गावांतील शेतकऱ्यांनी लोहारा येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. कमी क्षमतेच्या रोहित्रामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे जास्त क्षमतेचे रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे.

Electricity Sub-Station
Baliraja Electricity Scheme : बळीराजासाठी मोफत वीज योजनेत मोठी भर; महावितरणला २,००० कोटींचा निधी

येणेगूर येथील वीज उपकेंद्रांतर्गत लोहारा वीज वितरण कार्यालयांतर्गत येते. या केंद्रातून नळवाडी व दाळिंब या दोन फीडरला वीजपुरवठा करण्यात येतो. यातील नळवाडी फीडरवरती सुपतगाव, करवंजी, कोराळ, नळवाडी, तर दाळिंब फीडरवर दाळिंब, चिंचोली भुयार, सुंदरवाडी, येणेगूर महालिंगरायवाडी, तुगाव या गावांचा समावेश आहे.

परंतु अतिरिक्त भार पडत असल्याने सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यातच एक दिवस चालू, तर दोन दिवस वीजपुरवठा बंद राहतो.

त्यामुळे या ठिकाणी दहा एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात यावे; तसेच उमरगा ते येणेगूर सबस्टेशनला जोडणारी मुख्य वीजवाहिनी त्वरित बदलण्यात यावी, अन्यथा दहा गावांतील सरपंचांसह शेतकरी दहा फेब्रुवारीपासून येणेगूर येथील उपकेंद्रासमोर उपोषण व ११ फेब्रुवारीला राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदन देताना नेताजी कवठे, संजय कुंभार, बालाजी पाटील, ग्यानू शिरोळे, रतन लामजणे, सुधाकर चव्हाण, शिवाजी कवठे, जीवन कवठे, विठ्ठल कवठे, बाळासाहेब कवठे,वअप्पू शिवरे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com