Electricity Revenue : वीजविक्रीतून महसूल १९०० कोटींवर, ऊर्जा क्षेत्रात नवा विक्रम

Energy Innovation : पुणे परिमंडलामध्ये दरमहा वीजविक्रीचा महसूल आता १९०० कोटींवर गेला आहे. सद्यःस्थितीत पुणे परिमंडलामध्ये २४३ कोटी रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.
Mahavitaran
MahavitaranAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे परिमंडलामध्ये दरमहा वीजविक्रीचा महसूल आता १९०० कोटींवर गेला आहे. सद्यःस्थितीत पुणे परिमंडलामध्ये २४३ कोटी रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. या महसुलाची वसुली करताना शून्य थकबाकीला प्राधान्य द्यावे व कोणत्याही परिस्थितीत चालू वीजबिलांची १०० टक्के वसुली करावी. तसेच नवीन वीजजोडणी, ‘सौर’शी संबंधित विविध योजना, अचूक बिलिंग आदींच्या माध्यमातून ग्राहकसेवा आणखी गतिमान करावी असे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले.

रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात पुणे परिमंडलातील विविध कामांचा मुख्य अभियंता श्री. पवार यांनी बुधवारी (ता. २) आढावा घेतला. या वेळी वित्त विभागाच्या सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत, प्रशासन विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते. पुणे परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कृती मानकांनुसार निश्‍चित केलेल्या कालावधीत तत्पर ग्राहक सेवा देण्यासाठी अधिक सजग व सज्ज राहावे. तसेच ज्या शाखा कार्यालयांचे ग्राहकसंख्येनुसार विभाजन करणे आवश्यक आहे तसे प्रस्ताव त्वरित सादर करावेत अशी सूचना या वेळी त्यांनी केली.

Mahavitaran
Go Green Scheme Mahavitaran: ‘गो ग्रीन’ योजनेस दोन लाख ग्राहकांची पसंती

मुख्य अभियंता श्री. पवार यांनी सांगितले, की थकबाकीसोबतच चालू वीजबिलांची १०० टक्के वसुली करणे क्रमप्राप्त आहे. ग्राहकसेवेच्या बाबतीत पुणे परिमंडलाची कामगिरी उंचावत आहे. नवीन वीजजोडण्या देण्याचा मासिक वेग १६ हजारांवरून २० हजारांवर गेला आहे. नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी इन्फ्राची गरज नाही तेथे कोटेशनचा भरणा केल्यानंतर तत्काळ वीजजोडणी देण्यात यावी.

अचूक बिलिंगमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. त्याचे प्रमाण वाढून ९५.५२ टक्क्यांवर गेले आहे. वीजग्राहकांची डिजिटल ग्राहकसेवेला पसंती वाढत असून दरमहा राज्यात सर्वाधिक सरासरी ८३ टक्के लघुदाब वीजबिलांचा भरणा ऑनलाइनद्वारे होत आहे. तसेच गो-ग्रीन योजनेला पुण्यातील वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक पसंती दिली आहे.

Mahavitaran
Mahavitaran Abhay Yojana : अभय योजनेला मुदतवाढ

पुणे परिमंडलामध्ये भविष्यातील वीजसेवेसाठी प्रस्तावित अतिउच्चदाबाच्या २१ पैकी ८ उपकेंद्रांना महावितरणकडून मंजुरी मिळाली आहे. तत्पर ग्राहकसेवेसाठी भोसरी, चाकण उपविभागांचे विभाजन करून नवीन उपविभाग व शाखा कार्यालये तसेच नगररोड विभागात नवीन लोहगाव व चंदननगर शाखा कार्यालयांना मंजुरी मिळाली आहे.

‘सौर’च्या माध्यमातून पारंपरिकतेकडून अपारंपरिक ऊर्जानिर्मितीकडे नव्या परिवर्तनाचा वेगवान प्रवास सुरू झाला आहे. यातील पीएम सूर्यघर मोफत वीज योजना व इतर ‘सौर’ योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आणखी वेग द्यावा.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, महावितरण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com