Chara Chawani : शिरूरच्या पश्चिम भागात चारा छावण्यांची मागणी

Fodder Shortage : कान्हूर मेसाईसह तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, चिंचोली मोराची, शास्ताबाद, खैरेनगर, लाखेवाडी परिसरातील विहिरी कोरड्या पडू लागल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
Chara Chhavani
Chara ChhavaniAgrowon

Pune News : कान्हूर मेसाईसह तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, चिंचोली मोराची, शास्ताबाद, खैरेनगर, लाखेवाडी परिसरातील विहिरी कोरड्या पडू लागल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

त्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने या भागात शासनाने तत्काळ चारा छावणी सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मार्च महिन्याच्या प्रारंभीच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

Chara Chhavani
Chara Chavani : माण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून चारा छावण्या करण्याची मागणी

या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे परिसरात विहिरींसह विंधन विहिरीमध्ये अत्यल्प पाणीसाठा राहिला असून अनेक लहान मोठे बंधारे कोरडे पडले़ आहेत.

Chara Chhavani
Chara Chavani : जुन्नरच्या पूर्व भागात चाराटंचाई ; चारा छावणी सुरू करण्याची मागणी

मात्र पाणीसाठा कमी झाल्याने नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर शेतातील चारा पिके पाण्याअभावी जळू लागली असल्याने जनावरांच्या चाऱ्याची समस्या जाणवू लागली आहे.

त्यामुळे पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवायची तरी कशी, असा प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांना पडला असल्याने या भागात जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ व नागरिक करत आहेत.

उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पाणीपातळी घटली असताना विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत असल्याने शासनाने तत्काळ चारा छावणी सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.
- संदीप सु्क्रे, सुक्रेवाडी, शिरूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com