Chara Chavani : माण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून चारा छावण्या करण्याची मागणी

Cattle Camp : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही अद्याप पाऊस न पडल्याने पेरणी केलेल्या शेतातील पिके सुकू लागली आहेत. विहिरी कोरड्या पडल्या असल्याने पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Chara Chhavani
Chara ChhavaniAgrowon

Satara News : माण तालुक्याच्या उत्तर भागात पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने पाण्याचे टँकर वाढविण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Chara Chhavani
Maharashtra Rain : राज्यात १८ ऑगस्टपासून पाऊस वाढणार; मराठवाडा, विदर्भात पाऊस सुरु होणार

माण तालुक्यातील उत्तर भागातील वडगाव, पांगरी, बिजवडी, मोगराळेसह भागातील गावांत निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठा पाऊस झाले नाहीत. यामुळे नागरिक, जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मार्च महिन्यापासून पाणीटंचाईने हैराण झालेल्या ग्रामस्थांना शासनाच्या टँकरचे पाणी मुबलक मिळत नसल्याने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. आता फिडिंग पॉइंटवरतीही पाण्याची टंचाई होऊ लागल्याने टँकरच्या ठरलेल्या खेपा होत नाहीत. त्यामुळे पुन्हा पाणीटंचाई वाढली आहे.

Chara Chhavani
Animal Fodder : पाऊस लांबल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न

या भागात पावसाची ओढही कायम राहिली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे लक्ष दिल्याने जनावरांची संख्याही चांगलीच वाढली आहे. त्यात त्यांच्याकडील चारा संपला आहे. पाऊस न झाल्याने चारा तयार करता आला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी विकतचा चारा घ्यावा लागत आहे. तो घेण्यासाठी फलटण तालुक्यात वणवण करावी लागत आहे. चाऱ्याची मागणी वाढल्याने त्याठिकाणीही चाऱ्यासाठी जास्त पैसे घेतले जात आहेत. जास्त पैसे देऊनही चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

शासनाने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी अजून दुसरे फिडिंग पॉइंट शोधून ठरलेल्या टँकरच्या खेपा करण्याबरोबरच वाढीव खेपा देऊन पाणीटंचाई दूर करावी. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने उत्तर माणमधील गावात चारा डेपो अथवा चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com