Fodder Management
Fodder ManagementAgrowon

Animal Fodder : पाऊस लांबल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न

Monsoon Update : मॉन्सून लांबत असल्याने व विदर्भात त्याचे आगमन २४ जूनपूर्वी होण्याची शक्यता फार कमी असल्याने यंदा पेरण्यांना जुलै महिना उजाडणार आहे.
Published on

Amravati News : मॉन्सून लांबत असल्याने व विदर्भात त्याचे आगमन २४ जूनपूर्वी होण्याची शक्यता फार कमी असल्याने यंदा पेरण्यांना जुलै महिना उजाडणार आहे.

पेरण्या लांबत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसले तरी पशूंच्या चाऱ्यांचा प्रश्‍न मात्र निर्माण होण्याची शक्यता आहे. सोबतच फळबागांना हलके ओलित न केल्यास विशेषतः संत्रा पिकाचे नुकसान होणार आहे.

मॉन्सून सध्या आहे तिथेच अडकला आहे. बिपॉरजॉय वादळ पूर्णतः नष्ट झाल्याशिवाय मॉन्सूनची वाटचाल होणार नाही. हवामान शास्त्रीय परिस्थिती बघता मॉन्सून विदर्भात २४ जूनपूर्वी येण्याची शक्यता फारच कमी आहे.

पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांना सुरुवात होणार नसल्याने यंदा पेरण्यांना जुलैमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रारंभ होण्याची शक्यता आहे. पेरण्या लांबल्याने शेतकऱ्यांचे विशेष नुकसान होणार नसून जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्‍न मात्र निर्माण होणार आहे.

Fodder Management
Fodder Storage : सुक्या चाऱ्याची योग्य साठवण

त्यांना ताजा ओला चारा मिळण्याची शक्यता नसून सोयाबीन कुटार किंवा सुका चाऱ्यावर गुजराण करण्याची वेळ येणार आहे. पहिल्या पावसाने गवत उगवून जनावरांना ओल्या चाऱ्याची सोय होते. मात्र यंदा पाऊस लांबत असल्याने हा चारा लवकर उपलब्ध होणार नाही.

वाढलेल्या तापमानाचा फटका फळबागांनाही बसत असल्याने शेतकऱ्यांनी हलके ओलित सुरू ठेवण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी दिला आहे. विशेषतः संत्रा पिकाला या तापमानाचा अधिक फटका बसण्याची शक्यता असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

उष्णतेची लाट

विदर्भातील भंडारा व बुलडाणा सोडून उर्वरित जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. २४ जूनपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com