Mahashivratri : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी

Bhimashankar : महाशिवरात्रीनिमित्त १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सोहळा साजरा होत आहे.
Bhimashankar
Bhimashankar Agrowon
Published on
Updated on

Pune News : महाशिवरात्रीनिमित्त १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त येथील महादेव मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज झाले आहे.

Bhimashankar
Agriculture Pumps : वाढीव पाणीपट्टीसह कृषिपंपांना पाणीमीटर बसविण्याला विरोध

महाशिवरात्रीच्या पहाटे पवित्र शिवलिंगाचे दर्शन महत्त्वाचे मानले जात असल्याने भाविक दोन दिवस आधीच भीमाशंकर येथे मुक्कामी येतात. त्यामुळे भक्तनिवास आणि इतर काही ठिकाणी भाविकांची राहण्याची व्यवस्था आहे. मंदिर आणि परिसरात बॅरिकेडिंग, सजावट, रंगरंगोटी, स्वच्छता अशी कामे करण्यात आली आहेत.

Bhimashankar
Agriculture Management : टणक, चोपण जमिनीसाठी सबसॉयलर

वाहनतळ ते भीमाशंकर बस स्थानकापर्यंत ३५ मिनी आणि मोठ्या एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवलिंगाच्या दर्शनासाठी बारीसह मुख दर्शन व पासची सुविधा आहे. घोडेगाव, खेड पोलिस ठाण्याअंतर्गत उपविभागीय पोलिस अधिकारी, पाच पोलिस निरीक्षक, २० सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक अधिकारी तसेच २६० पोलिस कर्मचारी, ४० होमगार्ड असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच श्‍वान पथकही नेमण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले.

हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे. यात्रेसाठी देवस्थानच्या वतीने भाविकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com