Rabi Season : रब्बीसाठी ३२ हजार क्विंटल बियाण्यांची जिल्ह्यात मागणी

Seeds Demands : शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३२ हजार ८७८ क्विटंल बियाण्यांची मागणी केली आहे.
Rabi Seeds
Rabi SeedsAgrowon
Published on
Updated on

Pune News : पावसाळ्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामाची पुणे जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३२ हजार ८७८ क्विटंल बियाण्यांची मागणी केली आहे. कृषी आयुक्तलयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाण्यांचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा जिल्ह्यात खरिपात शेतकऱ्यांसाठी दोन हजार ४३ कोटी ४३ लाख रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी २ हजार २६२ कोटी ७६ लाख ५६ हजार रुपयांचे पीककर्ज घेतले आहे. त्यातच चांगला पाऊस पडल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे. पश्चिम पट्ट्यात पुरेसा पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. पूर्व पट्ट्यातही चांगला पाऊस झाल्याने काही प्रमाणात पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगाम शेतकऱ्यांना चांगला जाण्याची शक्यता आहे. परंतु आर्थिक अडचणी असल्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) ६८१ कोटी २३ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Rabi Seeds
Rabi Season : रब्बीसाठी पीक प्रात्यक्षिके, बियाणे वाटप कार्यक्रम राबविणार

पुरेसा पाऊस झाल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अजूनही आहे. त्यामुळे रब्बी हंगामात ज्वारीचे पेरणी क्षेत्र काही प्रमाणात वाढणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी खरिपात झालेल्या चांगल्या पावसामुळे रब्बी ज्वारीच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने जवळपास दोन लाख ८० हजार ५९५ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात ज्वारीची सुमारे एक लाख ३० हजार हेक्टरवर पेरणीची शक्यता आहे. रब्बी ज्वारीपाठोपाठ गव्हाचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे.

Rabi Seeds
Rabi Seed : हिंगोली जिल्ह्यात रब्बीच्या ३९ हजार ९०८ क्विंटल बियाण्याची विक्री

हरभऱ्याचे ३६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी महाबीजकडून १२ हजार २० क्विंटल, खासगी कंपन्याकडून २० हजार ८५८ क्विंटलल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. गेल्या तीन वर्षांत रब्बी हंगामात सरासरी २९ हजार ३२५ क्विटंल बियाण्यांची विक्री झाली होती. यामध्ये २०२०-२१ मध्ये २६ हजार ११८ क्विंटल, २०२१-२२ मध्ये ३२ हजार ७२० क्विंटल, २०२२-२३ मध्ये २९ हजार ३२५ क्विंटलची विक्री झाली होती. गेल्या वर्षी ३० हजार ३६२ क्विटंलची मागणी होती. परंतु पाऊस कमी झाल्याने २२ हजार ३९० क्विटंल बियाणे विक्री झाली.

रब्बी हंगामासाठी बियाण्यांची मागणी स्थिती

पीक बियाणे मागणी (क्विटंल)

ज्वारी ३८५०

गहू १८,५६३

हरभरा ६७२०

सुर्यफूल २

करडई १

मका १९६५

इतर तृणधान्य ६९

इतर कडधान्य ७७५

इतर तेलबिया ५५

भाजीपाला ८६२

एकूण ३२,८७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com