Rabi Season : रब्बीसाठी पीक प्रात्यक्षिके, बियाणे वाटप कार्यक्रम राबविणार

Seed Distribution Program : धाराशिव तालुक्यात पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाणे वाटप कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
Rabi Seed
Rabi SeedAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : कृषी विभागाकडून रब्बी हंगामासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. धाराशिव तालुक्यात पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाणे वाटप कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

रब्बीसाठी शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे. त्यातून सोडत पद्धतीने निवडलेल्या तीन प्रवर्गातील शेतकऱ्यांना हे बियाणे देण्यात येईल.

Rabi Seed
Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे पेरणी करताना जमिनीनुसार वाण निवडा

यात दहा वर्षांच्या आतील आणि दहा वर्षांवरील वाणांचा समावेश आहे. दहा वर्षांच्या आतील वाणांसाठी एकूण ४७७ लाभार्थ्यांची निवड होईल. यात सर्वसाधारण गटातील ३५७, अनुसूचित जातीमधील ८१ तर अनुसुचित जमातीतील ४१ लाभार्थ्यांची निवड होईल.

दहा वर्षांवरील ज्वारीच्या वाणांसाठी १७८ लाभार्थ्यांची निवड होईल. त्यात सर्वसाधारणमधील १३३, अनुसूचित जातीतील ३० तर अनुसूचित जमातीतील १५ लाभार्थी निवडले जातील.

Rabi Seed
Authentic Seeds : पंदेकृवीत रब्बीसाठी हरभरा, गहू, ज्वारीचे सत्यप्रत बियाणे उपलब्ध

गावांची निवड मंडल स्तरावर होणार

पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम देखील राबविण्यात येणार आहे. त्यासाठी गावांची निवड मंडलस्तरावर होणार आहे. तालुक्यातील निवड झालेल्या गावांत जवळपास ८४० पीक प्रात्यक्षिके होणार आहेत.

प्रतिशेतकरी ४ किलो ज्वारीचे बियाणे देण्यात येईल, त्यासाठीचे ८४ क्विंटल ज्वारीचे बियाणे तालुका कृषी कार्यालयात दाखल झाले आहे, अशी माहिती धाराशिव तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com