Chalo Delhi Farmers : दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या कांड्या, आंदोलनाला हिंसक वळण

Farmers Delhi Chalo : शेती पिकाला हमीभाव मिळण्यासाठी उत्तरेतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत दिल्लीच्या सीमेवर कूच सुरू केली आहे.
Farmers Chalo Delhi
Farmers Chalo Delhiagrowon

Guaranteed Price Agricultural Crops : शेती पिकाला हमीभाव मिळण्यासाठी उत्तरेतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत दिल्लीच्या सीमेवर कूच सुरू केली आहे. दरम्यान पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीकडे येताच मोदी सरकारकडून त्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार तयारी करत आहे. काही ठिकाणी हायवेवर मोठ मोठे बॅरिकेड्स लावले आहेत तर काही ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

दरम्यान पंजाबच्या शेतकऱ्यांचा 'चलो दिल्ली' मोर्चा दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ३०,००० हून अधिक अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आली आहे. हा मोर्चा रोखण्यासाठी पोलीस दल जय्यत तयारी करत आहे.

हजारो शेतकरी ६ महिने पुरेल एवढे साहित्य घेऊन दिल्लीकडे येत आहे यासाठी दिल्ली पोलिसांनी सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबालाजवळ हरयाणाला लागून असलेल्या राज्याच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंदोलक पुढे आल्यास त्यांना दिल्लीत प्रवेश करू न देण्याचा पोलिसांचा चंग बांधला आहे.

त्यासाठी दिल्ली पोलिसांनी आधीच मोठ्या प्रमाणात अश्रूधुराच्या नळकांड्यांचा साठा केला आहे आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील टेकनपूर येथे असलेल्या बीएसएफच्या टीयर स्मोक युनिटकडून (टीएसयू) आणखी ३०,००० नळकांड्या मागवल्या आहेत. त्या ग्वाल्हेरहून दिल्लीत आणल्या जात आहेत. दरम्यान, पंजाब, हरयाणामध्ये इंटरनेट बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Farmers Chalo Delhi
Delhi Farmers Pretest : शेतकऱ्यांच्या मागण्यांना 'आरएसएस' प्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा; मात्र हिंसा समर्थनीय नाही

प्रत्येक अश्रूधुराचे नळकांडे जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत वापरण्याची मुभा असते त्यानंतर त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होतो, परंतु ते सैन्याच्या सरावासाठी सात वर्षांपर्यंत कांड्या वापरल्या जाऊ शकतात. खराब झालेल्या अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर आंदोलनात करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

आंदोलन सुरूच राहिल्याने दिल्लीतील मोक्याच्या ठिकाणी दंगलविरोधी पथक, सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. हरयाणासह टिकरी आणि सिंघू या दोन सीमा बंद असताना, उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवरून वाहतुकीला परवानगी देण्यात आली.

नवी दिल्लीकडे कूच करताना भोपाळमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या कर्नाटकातील शेतकऱ्यांची सुटका करण्यात यावी, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com