APMC Market : ‘एपीएमसी’त दैनंदिन आवक २०० गाड्यांनी घटली

Arrival of Vegetables Decreased : पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याच्या आवक घटली आहे.
Mumbai APMC
Mumbai APMCAgrowon
Published on
Updated on

Vashi News : पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाल्याच्या आवक घटली आहे. बाजारात दैनंदिन आवक २०० गाड्यांनी कमी झाल्याने त्याचा परिणाम थेट दरवाढीवर झाला आहे. घाऊक किमतीत ३० टक्के; तर किरकोळ बाजारात दुप्पट दर वाढले आहेत.

सध्या परराज्यातून भाज्यांची आवक सुरू आहे. मुंबई एपीएमसीत दररोज ५५० ते ५७५ गाड्यांची आवक होते. त्यामध्ये ३५०हून अधिक लहान वाहनांचा समावेश आहे. यामुळे सरासरी आवक ही ३५० ते ४०० गाडी एवढीच आहे. याचा फटका दरवाढीला बसला आहे. भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, शेवगा आणि वांगी या भाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात घाऊकला ३० टक्के; तर किरकोळ बाजारात ६० ते ७० टक्के दरवाढ झाली आहे.

Mumbai APMC
Jalgaon APMC : जळगाव बाजार समितीला अतिक्रमणांचा वेढा कायम

किरकोळ बाजारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य भरडला जात आहे. राज्यातील पुणे, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर येथून एपीएमसीत आवक होते, तसेच परराज्यातून मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक येथून आवक सुरू आहे. अवकाळी पाऊस तसेच वाढत्‍या तापमानाचा भाजीपाला उत्‍पादनाला मोठा फटका बसला आहे.

बाजारातील आवक

भाजी आवक (क्विंटल)

वांगी २,१६४

कोबी १,८५७

भेंडी १,३३७

फ्लॉवर १,२८८

काकडी ९१९

शेवगा ३६०

Mumbai APMC
Pune APMC : बनावट पावती पुस्तक गैरव्यवहार तपास ‘जैसे थे’

बाजारातील घाऊक दर

भाजी दर (रुपये)

शेवगा १२०

गवार ८०

टोमॅटो ८०

वांगी ६०

भेंडी ६०

कोथिंबीर जुडी ७०

भाज्यांची दरवाढ झाल्यामुळे बाजारात कोणती भाजी विकत घेऊ, असा प्रश्‍न पडत आहे. सर्वच भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दर वाढल्यामुळे सध्या कडधान्य खाण्याकडे जास्त कल आहे.
मनिषा जाधव, गृहिणी
भाज्यांंची आवक कमी झाल्यामुळे दर वधारले आहेत, आणखी महिनाभर दर चढेच राहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्‍यास भाजीपाल्‍याची आवक वाढण्याची शक्‍यता आहे, त्‍यानंतर दर नियंत्रणात येतील.
आनंदा बोऱ्हाडे, भाजीपाला व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com