Potato Farming
Potato FarmingAgrowon

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

Potato Farming : यंदा मागील वर्षीच्या तुलनेने चांगला बाजारभाव मिळत असल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.
Published on

Pargaon News : शिरदाळे (ता. आंबेगाव) परिसरात पावसाळी बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे. या वर्षी जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने बटाटा पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात काहीशी घट झाली आहे. असे असले तरी यंदा मागील वर्षीच्या तुलनेने चांगला बाजारभाव मिळत असल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.

Potato Farming
Potato Farming : सातगाव पठार परिसरात बटाटा पीक बहरले

शिरदाळे गाव हे उंच पठारावर वसलेले आहे परिसरातील ९० टक्के क्षेत्रावर पावसाळी बटाटा लागवड केली जाते यावर्षी लागवड झाल्यानंतर सुरुवातीला पावसाने ताण दिला त्यानंतर काही दिवसाने पावसाला सुरुवात झाली तर जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने त्याचा बटाटा पिकावर विपरीत परिणाम झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. असे माजी उपसरपंच मयूर सरडे यांनी सांगितले.

Potato Farming
Potato Crop : सातगाव पठार परिसरामधील बटाटा पीक फुलोऱ्यात

शेतकरी प्रामुख्याने ज्योती, १५:३३, पेप्सिको या बटाटा वाणाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात यासाठी भांडवली खर्च ही मोठ्या प्रमाणावर येतो एक एकर क्षेत्रातील लागवडीसाठी १५ ते १६ पिशवी बटाटे बियाणे लागते (प्रत्येक पिशवीचे वजन ५० किलो भरते) एका पिशवी मागे तीन चार पिशवी गळीत (उत्पादन) निघत आहे.

सध्या बटाट्याला प्रति १० किलोला २५० ते ३०० रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन कमी मिळत असले तरी मागील वर्षीच्या तुलनेने बाजारभाव चांगला मिळत आहे.
गणेश तांबे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com