Gender Ratio : मुलींच्या कमी संख्येमुळे लग्नसंस्थेवर परिणाम ; हजार मुलांमागे ९३१ मुली

Maharashtra Gender Statistic : मुलांच्या विवाहाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. त्यातूनच अनेकांची फसवणूक देखील होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, अनेक वर्षांपासून मुलींचा घटत असलेला जन्मदर हे आहे.
Maharashtra Gender Statistic
Gender RatioAgrowon
Published on
Updated on

Solapur News : मुलांच्या विवाहाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. त्यातूनच अनेकांची फसवणूक देखील होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, अनेक वर्षांपासून मुलींचा घटत असलेला जन्मदर हे आहे.

सोलापूर शहरात एक हजार मुलांमागे ९३६ तर जिल्ह्यात हे प्रमाण ९३१ पर्यंत आहे. मंगळवेढा, माढा, उत्तर सोलापूर या तालुक्यात अजूनही एक हजार मुलांमागे ९२२ इतके मुलींचे प्रमाण आहे.

गरजू कुटुंबीयांनाही मुलगी ओझे वाटू नये, यासाठी केंद्राने सुकन्या योजना आणली. शेकडो कोटींचा निधी खर्च करून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान राबविले. राज्य सरकारने लेक लाडकी योजना आणली, उच्च शिक्षणही मोफत केले, अनेक प्रवर्गातील मुलींना शिष्यवृत्ती दिली.

Maharashtra Gender Statistic
Agriculture Transport: शेतीमालाच्या दळणवळणाचे धोरण

तरी, मुलींचे प्रमाण वाढले नसल्याचे आरोग्य विभागाकडील आकडेवारीतून दिसते. सोलापूर शहरात २०२१-२२ मध्ये मुलींचा जन्मदर ९५४ होता. त्या नंतर २०२२-२३ मध्ये ९५९ वर पोचलेला मुलींचा जन्मदर चालू वर्षात ९३६ पर्यंत खाली आला आहे.

ग्रामीणमधील मुलींचा जन्मदर मात्र तीन वर्षांत ९३४च्या वर गेलेला नाही. कौटुंबिक हिंसाचारव हुंडाबळी, मुली -महिलांवरील अत्याचारात वाढ, बेरोजगारी, अशी कारणे त्यामागे असल्याचे सांगितले जाते.

Maharashtra Gender Statistic
Agriculture Technology : नवी पीकपद्धती, तंत्रज्ञान वापरातून ‘देगाव’ची वाटचाल

जिल्ह्यात २०२४ मध्ये ८४ बालविवाह रोखण्यात आले. तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये तब्बल एक हजार ३४४ बालकांचा (० ते ५ वर्षे) मृत्यू झाला आहे. त्यात अक्कलकोटमध्ये १०६, बार्शीत १२७, करमाळ्यात ८२, माढ्यात १७१, माळशिरस व मंगळवेढा तालुक्यात प्रत्येकी १०६, मोहोळ तालुक्यात १४९, पंढरपूर तालुक्यात १७४, सांगोल्यात १०२, उत्तर सोलापुरात ६९ आणि दक्षिण सोलापुरात १५३ बालमृत्यू झाले आहेत.

तालुकानिहाय जन्मदर (कंसात २०२३चे प्रमाण)

तालुका मुलींचा जन्मदर

पंढरपूर ९४६ (९५५)

करमाळा ९४३ (९३१)

माळशिरस ९४२ (९४९)

अक्कलकोट ९४१ (९४७)

बार्शी ९४१ (९३१)

द. सोलापूर ९३८ (९६६)

सांगोला ९३१ (९५३)

मोहोळ ९२९ (९३७)

उत्तर सोलापूर ९२२ (९०९)

माढा ९१४ (९३७)

मंगळवेढा ९१२ (९२८)

महिला व बालविकास विभागाची माझी कन्या भाग्यश्री योजना देखील सुरु आहे. मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी प्रत्येक कुटुंबाला सरकारी योजनांची माहिती, मुलगी हिच वंशाचा दिवा असल्याचे महत्त्व पटवून देण्यावर भर देण्याचे नियोजन आहे.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com