Agricultural Crisis : भाव पडल्याने शेतकऱ्यांवर संकट; कर्जफेडीची चिंता वाढली

Worries about Debt Repayment : खरिपातील पीककर्जाची परतफेड केल्याशिवाय पुढील हंगामात नवीन कर्जासाठी पात्र ठरणार नसल्याने भविष्यातील आव्हानांचा सामना कसा करायचा असा प्रश्न आहे.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon
Published on
Updated on

Amravati News : यंदाच्या खरीप हंगामात शेतीमालास अपेक्षित दर मिळत नसल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांसमोर आता कर्जफेडीचे आव्हान उभे ठाकले आहे. खरिपातील पीककर्जाची परतफेड केल्याशिवाय पुढील हंगामात नवीन कर्जासाठी पात्र ठरणार नसल्याने भविष्यातील आव्हानांचा सामना कसा करायचा असा प्रश्न आहे. तर, कर्जवाटप ठेवीदारांच्या पैशांतून होत असल्याने ते वसूल करण्याची चिंता बॅंकांना लागली आहे.

२०२४-२५ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ४७५ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीय, खासगी व ग्रामीण बॅंकांकडून १,४६४.१२ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले आहे. हे कर्ज मार्चअखेरपर्यंत फेडल्यासच व्याज माफ होणार आहे. याशिवाय परतफेड न केल्या गेल्यास पुढील हंगामात नवीन कर्ज मिळण्यात अडचणी जाणार आहेत.

Farmer Issue
Farmers Debt relief : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत माहिती चुकल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा

यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसाने न नंतर आलेल्या कीड, रोगांनी उत्पादनाच्या सरासरीवर परिणाम पडला आहे. सरासरी घटली असतानाच बाजारात दरही कोसळले आहेत. बहुतांश कर्जदार शेतकरी कोरडवाहू पट्ट्यातील असून सोयाबीन, कापूस व तूर ही त्यांची मुख्य पिके आहेत.

Farmer Issue
Onion Farmers Issue : कांदा उत्पादकांना ५०० कोटींचा फटका

सोयाबीन, कापसाची हमीदराने शासकीय खरेदी होत असली तरी खरेदीतील अटींमुळे खुल्या बाजाराशिवाय पर्याय नाही. बाजारात दोन्ही पिकांचे दर हमीदराच्या तुलनेत फार कमी आहेत. तुरीचे दर पडू लागले असून सर्वच कर्जदार शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केलेली नाही. या शेतीमालाच्या विक्रीतून उत्पादन खर्च निघणे कठीण झाले असताना बॅंकांच्या कर्ज परतफेडीची चिंता आ वासून उभी झाली आहे.

बॅंकांसाठी कर्जवसुली हे आव्हान आहे. जानेवारी ते मार्च हे तीन महिने महत्त्वाचे आहेत. मार्च अखेरपर्यंत परतफेड केल्यास व्याजमाफी मिळणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी कोणत्याही घोषणेची प्रतीक्षा न करता परतफेड करून नवीन पीक कर्जासाठी पात्र झाले पाहिजे.
रमेश बकाल, मुख्य व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

पीक कर्जवाटपाची स्थिती (रुपये कोटींत)

बॅंक : शेतकरी संख्या : पीककर्ज

जिल्हा बॅंक : ५५,३४२ : ६४७.३०

राष्ट्रीय बॅंक : ५२,३३२ : ७३२.४५

खासगी बॅंक : २५०२ : ६६.८५

ग्रामीण बॅंक : १२९९ : १७.५३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com