Leopard Terror : चाकूर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत

Leopard Attack : दरम्यान काही वर्षातील अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वन्यप्राणी बचाव दलाची स्थापना करत अत्याधुनिक साहित्य उपलब्ध केल्याची माहिती सहायक वनसंरक्षक वृषाली तांबे यांनी दिली.
Leopard News
Leopard NewsAgrowon
Published on
Updated on

Latur News : जिल्ह्यात दरवर्षी बिबट्या व बिबट्या सदृश प्राण्यांची दहशत नित्याची ठरली आहे. यंदाही या प्राण्यांने चाकूर तालुक्यात दहशत निर्माण केली आहे. या प्राण्याने दोन कुत्रे व एका वासराचा गुरुवारी (ता. १५) रात्री फडशा पाडल्यानंतर वन विभाग सतर्क झाला असून विभागाने या प्राण्याला पकडण्यासाठी शिवणखेड व शिवणी (मजरा) शिवारात पिंजरे लावले आहेत.

दरम्यान काही वर्षातील अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वन्यप्राणी बचाव दलाची स्थापना करत अत्याधुनिक साहित्य उपलब्ध केल्याची माहिती सहायक वनसंरक्षक वृषाली तांबे यांनी दिली.

Leopard News
Leopard Terror : गोदाकाच्या कायगाव परिसरात बिबट्याचा संचार वाढला

जिल्ह्यात नेहमीच बिबट्यासदृश्य प्राण्यांचा वाढता वावर आहे. वासरे व कुत्र्यांना ठार केल्यानंतर वन विभागाकडून पिंजरे लावण्यात येतात. मात्र, हा प्राणी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले नाही. दोन वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या शेतातही या प्राण्यांचा वावर दिसून आला होता. त्यानंतर वन विभागाने प्रभावीपणे काम सुरू केले. तेव्हा वन विभागाकडे असे हिंस्त्र प्राणी पकडण्यासाठी आधुनिक साहित्य नसल्याचे पुढे आले.

यामुळे देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीतून २३ लाख २७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. यात निधीतून वन विभागाने वन्य प्राणी बचाव दलाची स्थापना करत पिंजरे, जाळे, बचाव दल कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कीट, वन्य प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी फायर इंजेक्शन, जीपीएस आदी सुविधा असलेले साहित्य उपलब्ध केले आहे.

Leopard News
Leopard Terror : आठ दिवसांत सहा बिबटे जेरबंद

साहित्य उपलब्ध झाल्यानंतरही बिबट्या किंवा बिबट्या सदृश प्राण्यांना पकडणे शक्य झाले नाही. शिवणखेड शिवारात गुरुवारी एका शेतकऱ्याच्या नजरेस बिबट्या पडला. त्यानंतर परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. वन विभागानेही शेतकऱ्यांना सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे.

शिवणखेड व शिवणी परिसरात आढळलेला बिबट्या सदृश प्राणी हा तरस असण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे नदीनाल्यांना आलेले पाणी पिण्यासाठी किंवा अन्नाच्या शोधात या प्राण्यांचा वावर वाढला असावा. शेतकऱ्यांना बिबट्या किंवा तरसमधील फरक समजत नाही. तरीही वन विभागाने आवश्यक ती पावले उचलली आहे. वन्यप्राणी बचाव दलाच्या माध्यमातून या प्राण्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न आहेत.
- वृषाली तांबे, सहायक वनसंरक्षक, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com