Onion Chawl: दौंडला अत्याधुनिक कांदा चाळींकडे कल

Onion Storage Shed: दौंड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साठवणुकीच्या पारंपरिक पद्धतीला मागे टाकत अत्याधुनिक कांदा चाळींचा वापर अधिक पसंती मिळत आहे.
Onion Storage Shed
Onion Storage ShedAgrowon
Published on
Updated on

Daund News: दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या साठवणुकीसाठी पारंपरिक कुडाच्या कांदा चाळींपेक्षा मोठ्या आकाराच्या अत्याधुनिक कांदा चाळीस पसंती देऊ लागले आहेत.

दौंड तालुक्यात शेतकऱ्यांच्या सुबत्तेत वाढ करण्यात उसासारख्या नगदी पिकाने मोठा हातभार लावला आहे. याच जोडीला अलिकडच्या काळात पूर्व भागातील रावणगाव, खडकी, नंदीदेवी, मळद आणि स्वामी-चिंचोली परिसरातील शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर कांदा पिकास पसंती देऊ लागले आहेत.

Onion Storage Shed
Onion Market : कांद्याचे पैसे थकविल्याने शेतकरी संतप्त

सिंचन सुविधांमुळे उसासह शेतकरी आता नगदी पीक असलेल्या कांदा उत्पादनाकडे वळाला आहे. यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात कांदा पीक घेत असल्याने, कांदा साठवणुकीसाठी पारंपरिक कांदा चाळी कमी करत अत्याधुनिक कांदा चाळी उभारत आहेत.

बाजारातील चढ-उतारात कांदा साठवणुकीतून चांगला दर मिळविण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. यासाठी उन्हाळी कांद्याच्या साठवणुकीसाठी पारंपरिक कुडाच्या कांदा चाळींपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आकाराच्या अत्याधुनिक कांदा चाळीस पसंती देऊ लागले आहेत.

Onion Storage Shed
Onion Procurement: ‘नाफेड-एनसीसीएफ’नी थेट बाजारातूनच कांदा खरेदी करावी: खासदार भगरे यांची मागणी

यासाठी सुमारे दोन ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करावी लागत आहे.दौंड तालुक्यातील मोठे कांदा उत्पादक शेतकरी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे, तर अल्पभूधारक शेतकरी दौंड-केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कांदा विक्रीसाठी पाठवत आहेत.

कांदा दराच्या चढ-उतारातील फरक साधण्यासाठी साठवणूक महत्त्वाची आहे. यासाठी शेतकरी मोठ्या आणि कायमस्वरूपी कांदा चाळीस पसंती देऊ लागले आहेत.
संजय रांधवण, प्रगतिशील बागायतदार, रावणगाव, ता. दौंड,
शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या कांदा चाळींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. जोडीला जिल्हा बॅंकेचे पीककर्ज त्याचबरोबर बळीराजा कर्ज योजनेचा लाभ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेता येतो.
अंगद शिंदे, कृषी सहायक, दौंड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com