Onion Farmers Akola : अकोल्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

Akola Onion : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या शेतकऱ्यांनी कांद्याच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. कांदा पिकाची वाढचं होत नसल्याने असे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
Onion Farmers Akola
Onion Farmers Akolaagrowon
Published on
Updated on

Crisis Onion Farmers : राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु, वाढता उन्हाळा आणि पाण्याच्या अभावामुळे अनेक जिल्ह्यात कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अकोला जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने उभ्या पिकावर नवीन संकट उभं ठाकलं आहे. चार महिने उलटले, तरीही कांदा पिकाची वाढ होईना. यामुळे तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांद्याच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. कांदा पिकाची वाढचं होत नसल्याने असे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

अकोल्यातील शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. ४ महिने उलटले तरी कांदा तयार होण्यास वेळ लागतो आहे. काही शेतकऱ्यांच्या कांद्याला पालवेही फुटलेले नाही, तर काहींचे कांदा पीक पूर्णपणे जळाले आहे. यांतून शेतकऱ्यांचा संयम सुटल्याने तेल्हारा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पीक जमीन दोस्त करून टाकले आहे. यावेळी काही शेतकऱ्यांना अश्रूअनावर झाले होते.

नोव्हेंबर महिन्यात कांदा पिकाची लागवड झाली, पिकात वाढ होत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा पिकावर अनेकदा औषधे फवारणी केल्या. परंतु, फरक जाणवलाच नाही. दानापूर आणि हिंगणी गावात कांदा पिकाच १०० टक्के नुकसान झाले आहे. याच नैराश्यामधून इथला शेतकरी कांदा पिक शेतातून उखडून फेकलं आहे, तर काही जण उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवत आहेत. अशी माहिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

Onion Farmers Akola
Onion Compensation: कुजलेल्या कांद्याची भरपाई कोण देणार?

धुळ्यातील शेतकऱ्यांवरही मोठे संकट

धुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात उन्हाळी कांद्यावर मोठे संकट उभारले आहे. उन्हाळी कांदा बाजारात येत असतानाच दरामध्ये मोठी घसरण सुरू झाली. लागवड आणि उत्पादन खर्च हाताबाहेर गेल्याने शेतकरी अडचणीत असताना दरात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. धुळ्यात १ हजार ५०० रुपये क्विंटलपर्यंत दर घसरला आहे. जिल्ह्यातील कांदा इंदौर, नाशिक, मुंबई, गुजराथच्या बाजार समितीत जातो. महिन्यापूर्वी कांद्याला क्विंटलला ४ हजारांपर्यंत भाव मिळत होता. पण, सध्या १ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला जात आहे.

कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवले

मागच्या काही काळापासून शेतकरी आणि शेतकरी संघटना कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावी म्हणून लढा देत होते. याला अंशत यश आले आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या सीमा शुल्क विभागाने कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेण्याची मोठी घोषणा केली. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवले आहे. १ एप्रिल २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याची निर्यात करताना कोणतेही शुल्क लागणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com