
Nagar News : गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट (Hailstorm) झाली. भाजीपाल्यासह (Vegetable Crop damage) फळे व शेतमालाला फटका बसला. भाजीपाल्याचे नुकसान झाले. दरातही सतत चढ-उतार होत आहे.
त्यामुळे भाजीपाला उत्पादकांना मोठा फटका बसत असून काही भाज्या फेकून देण्याची वेळ आली आहे. नुकसान व खराब झालेल्या भाज्यांना दर नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो, वांगी फेकून द्यावी लागली. असाच फटका फुलबाजारालाही बसला असल्याचे उत्पादक सांगत आहेत.
नगरसह राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला भाव मिळेना. शेतात पिकवलेला भाजीपाला अवकाळी पावसाने शेतातच खराब झाला. हाताशी आलेला गहू, हरभरा, सूर्यफूल, चिंच, आंबा यांनाही या गारपिटीचा चांगलाच फटका बसला.
तर काढणीला आलेले मोसंबी, संत्रा, द्राक्षे, चिकू, पेरू, यांचा बागेतच सडा पडला. फळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका गारपिटीने बसला.
सध्या बाजारात मिळणाऱ्या भाजीपाल्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग थेट ग्राहकांच्या दारावर जाऊन भाजीपाला विक्री करत आहेत.
बाजारात सध्या लिंबू, गवार, वाल, दोडक्याची आवक घटली आहे. या भाज्यांना बाजारभाव मिळत असला तरी टोमॅटो, वांगी, मेथी, कोथिंबीर, कोबी, काकडी, शेपू यांच्या भावात कमालीची घसरण झाली आहे.
शेतकऱ्यावर तिहेरी संकट
गेल्या खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात अवकाळी पावसाने शेतमालाला झोडपले. अनेकांचे शेतमाल व भाज्या शेतातच सडल्या. परिणामी उरलेला माल बाजारात विक्रीसाठी आणला, त्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने तो बाजारातच फेकून द्यावा लागतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.