Crop Insurance : अवेळी पाऊस, गारपीट नुकसानीपासून विमा संरक्षण

अवेळी पाऊस, गारपीट घडल्यापासून त्वरित ७२ तासांच्या आत आपल्या संबंधित विमा कंपनीस केंद्र शासनाचे पीक विमा ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक यापैकी एका माध्यमावर कळवावे. त्याची पोहोच शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल. जी पुढे विमा दावे स्थिती माहिती घेण्यासाठी उपयुक्त असते.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Crop Damage : राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) रब्बी हंगामातील (Rabi Season) गहू (Wheat), हरभरा (Chana), ज्वारी (jowar), कांदा या पिकांसाठी (Onion Crop) राबविण्यात येते. आंबिया बहरामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी,पपई या फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

सध्या काही ठिकाणी अवेळी पाऊस, गारपिटीमुळे धान्य पिके आणि काही फळपिकांचे नुकसान झाले आहे. अशावेळी नेमके काय करावे याबाबत शेतकऱ्यांना माहिती नसते.

त्यामुळे काही वेळेस त्यांना नुकसान होऊनही मिळणाऱ्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागते. यासाठी शेतकऱ्यांना योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

पीकविमा योजनेचे भाग

प्रधानमंत्री पीकविमा योजना ः यामध्ये रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी, कांदा या पिकासाठी विमा हप्ता भरून विमा योजनेत भाग घेतला असेल. त्यांना अवेळी पाऊस व गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देय आहे.

फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक विमा ः आंबिया बहरामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी,प पई या पिकांसाठी आहे. यामध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना अवेळी पाऊस आणि गारपिटीपासून विमा नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे.

मात्र गारपीट, हवामान धोक्यासाठी राज्य शासनाने विमा संरक्षण वेगळे दिले असल्याने शेतकऱ्यांना गारपिटीसाठी विमा हप्ता भरल्याची खात्री करून घ्यावी.

Crop Insurance
Crop Insurance Scam : ‘मविआ’च्या काळात पीक विमा घोटाळा; देवेंद्र फडणवीस यांचा आ रोप

नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्याने करावयाची कार्यवाही ः

नुकसानग्रस्त पिकाचा फोटो काढावा. या फोटोवर दिनांक, वेळ आणि त्या स्थळाचे अक्षांश, रेखांश असल्यास अधिक चांगले.

घटना घडल्यापासून त्वरित ७२ तासांच्या आत आपल्या संबंधित विमा कंपनीस केंद्र शासनाचे पीकविमा ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक यापैकी एका माध्यमावर कळवावे. त्याची पोहोच शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर येईल. जी पुढे विमा दावे स्थिती माहिती घेण्यासाठी उपयुक्त राहील.

यानंतर विमा कंपनी नियमानुसार विमा नुकसान भरपाई निश्‍चित करून शेतकऱ्यांच्या विमा अर्जात नोंदवलेल्या बँक खात्यावर जमा करेल.

फळपीक विमा योजनेत अवेळी पावसाबाबत जी प्रमाणके विमा योजनेत निश्‍चित केलेली आहेत, त्या कालावधीत आणि त्या हवामान धोक्यासाठी निर्धारित रकमेच्या मर्यादेत नुकसान भरपाई देय राहते.

गारपीट हवामान धोक्यापासून संरक्षण कालावधी आणि विमा संरक्षित रक्कम

पीक - विमा संरक्षण कालावधी - विमा संरक्षित रक्कम रु./हे.

संत्रा - १ जानेवारी ते ३० एप्रिल - २६,६६७

मोसंबी - १ जानेवारी ते ३० एप्रिल- २६,६६७

डाळिंब- १ जानेवारी ते ३० एप्रिल- ४३,३३३

काजू- १ जानेवारी ते ३० एप्रिल- ३३,३३३

केळी - १ जानेवारी ते ३० एप्रिल- ४६,६६७

द्राक्ष- १ जानेवारी ते ३१ मे - १,०६,६६७

स्ट्रॉबेरी- १ जानेवारी ते ३० एप्रिल- ६६,६६७

आंबा- १ फेब्रुवारी ते ३१ मे - ४६,६६७

पीक हवामान धोके विमा संरक्षण कालावधी प्रमाणके (ट्रिगर) कमाल विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर

द्राक्ष (अ गट ) अवेळी पाऊस प्रतिदिन (मि.मी) १६ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर

या कालावधीत प्रतीदिन पाऊस ४ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त ४,२०० रु. ३२,२५०/-

११ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त ६,४५० रु.

२१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त ८,३०० रु.

३१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त १०,८०० रु.

४१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त १६,१०० रु.

५१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त ३२,२५० रु.

८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर

या कालावधीत प्रतीदिन पाऊस ४ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त १०,७०० रु. १,७२,००० /-

११ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त १६,००० रु.

२१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त ३२,६०० रु.

३१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त ४८,३०० रु.

४१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त १,२८,७०० रु.

५१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त १,७२,००० रु.

१ डिसेंबर ते ३० एप्रिल

या कालावधीत प्रतीदिन पाऊस ४ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त १०,७०० रु. २,६८,८००/-

११ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त २१,५०० रु.

२१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त २६,३०० रु.

३१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त ४३,००० रु.

४१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त ५४,१०० रु. + पहिल्या व दुसऱ्या टप्यातील शिल्लक रकमेच्या १०० टक्के रक्कम देय

५१ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त ६४,५५० रु. + पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील शिल्लक रकमेच्या १०० टक्के रक्कम देय

Crop Insurance
Crop Damage : वातावरण बदलाचा बागायतदारांना फटका

द्राक्ष (ब) द्राक्ष (ब) गटातील जिल्हयांसाठी हवामान धोके निहाय नुकसान भरपाई रकमेत थोडासा बादल आहे , मात्र एकूण रक्कम देय ३,२०,००० रू. आहे. ७०,०००/-

स्ट्रॉबेरी अवेळी पाऊस(मि.मी), सापेक्ष आर्द्रता व जास्त तापमान १५ ऑक्टोबर ते

३० नोव्हेंबर या कालावधीत सलग दोन दिवस प्रतिदिन २० मि.मी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता ९५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रक्कम २८,००० रुपये

या कालावधीत सलग ३ दिवस प्रतिदिन २० मि.मी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता ९५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रक्कम ४२,००० रुपये

या कालावधीत सलग ४ दिवस प्रतिदिन २० मि.मी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता ९५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रक्कम ७०,००० रुपये

१ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत एका दिवसात २० मि.मी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता ९५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त, तसेच तापमान ३० अंश सेल्सि किंवा जास्त राहिल्यास रक्कम ६५,००० देय. ६५,०००/-

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com