Onion Crop Damage : कांदा रोपांवर तणनाशक फवारल्याने मोठे नुकसान

Weedicide : दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटातून शेतकरी जात आहेत. डाळिंब व वीजपंप चोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
Onion Crop Damage
Onion Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Nashik News : दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटातून शेतकरी जात आहेत. डाळिंब व वीजपंप चोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशा विविध संकटांचा सामना करावा लागत असतानाच रावळगाव (ता. मालेगाव) येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप जाधव यांच्या कांदा रोपांवर काही समाजकंटकांनी तणनाशक टाकले. यामुळे तीन एकर लागवड होईल, एवढी रोपे नष्ट झाली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

श्री. जाधव यांनी आगामी उन्हाळ कांदा लागवड डोळ्यांसमोर ठेवून कांदा रोपे लावली होती. जवळपास १५ हजार रुपयांचे बियाणे टाकून रोपांची जपणूक केली. त्यांनी वेळोवेळी निंदणी, खुरपणी, फवारणी व पाणी देत रोपांची काळजी घेतली. ५० ते ५२ दिवसांचे रोप टवटवीत होते.

Onion Crop Damage
Hail Affected Onion : गारपीटग्रस्त कांदा पिकासाठी उपाययोजना

दोन-तीन दिवसांत मजुरांच्या उपलब्धतेनुसार या रोपांतून तीन एकरावर उन्हाळ कांदा लागवडीचे नियोजन होते. जाधव कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या कांदा उळ्यावर तणनाशक फेकले. यामुळे संपूर्ण उळे नामशेष झाले. हिरवेगार उळे काळपट पडले. श्री. जाधव यांचे ५० हजारांवर रुपयांचे नुकसान झाले. या कृत्याबाबत परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Onion Crop Damage
Onion Crop : अवकाळी पावसानंतर कांदा पीक कसं वाचवायचं?

तालुक्यासह ‘कसमादे’मध्ये समाजकंटकांकडून अनेकदा शेतकऱ्यांना लक्ष्य केले जाते. काही महिन्यांपूर्वी कांदा चाळींमध्ये नासधूस करण्यात आली. युरिया टाकून चाळींमधील कांदा खराब करण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. शेतमळ्यांतील जनावरे चोरीचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. भुरट्या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चोरीच्या घटनांना अटकाव केव्हा?

तालुक्यात चार महिन्यांपासून शेतमळ्यांतील चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. चोरट्यांनी आपला मोर्चा डाळिंब बागांकडे वळविला. रात्री-अपरात्री डाळिंबाची चोरी केली जाते. शेतमळ्यांमधील विहिरींवरील वीजपंप चोरीचा सपाटा भुरट्या चोरांनी लावला आहे.

वडनेर खाकुर्डी व तालुका पोलिस ठाण्यात या संदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. अपवाद वगळता वीजपंप चोरणाऱ्यांना अटकाव करण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com