Swapnil Shinde
राज्यात अनेक जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भात, कापूस, द्राक्ष आणि कांदा पिकाला फटला बसला आहे.
या नुकसानीची सरकारमधील काही मंत्र्यांनी पाहणी करण्यात आली. त्यानंतर महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने पंचनाम्याचे काम सुरू आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीवर टीका केली.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर विधीमंडळाचे कामकाज संपल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्यात पाहणी दौरा केला.
मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांतील नुकसानग्रस्त पिकांचे पाहणी केली.
या भागात कापूस, तूर आणि धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याबद्दल भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.
त्यावर येथील पिकांचे पंचनामे पूर्ण करून लवकरात लवकर मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.