Unseasonal Rain : रब्बी पिकांसह फळबागा, पालेभाज्यांचे मोठे नुकसान

पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाने पुन्हा दणका दिला आहे. या पावसामुळे पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले असून रब्बी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Pune News : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाने (Stormy Rain) पुन्हा दणका दिला आहे. या पावसामुळे पिकांचे व फळबागांचे नुकसान (Heavy Rain Crop Damage) झाले असून रब्बी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

या मध्ये रब्बी ज्वारी, गहू, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, केळी, आंबा, काजू, पपई व इतर पालेभाज्यांचे समावेश आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान (Cloudy Weather) असून, पावसाने हजेरी लावली आहे.

सातारा जिल्ह्याच्या अनेक भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने झोडपले आहे. वाई, खंडाळा, कराड, पाटण, कोरेगाव, सातारा या तालुक्यात पाऊस झाला आहे.

रब्बी पिकांची काढणी सुरू असून, पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पावसामुळे ऊसतोड खोळंबून आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही भागांत बुधवारी (ता. १५) रात्री उशिरा पावसाचा शिडकावा झाला. दरम्यान, गुरुवारी (ता. १६) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाच्या वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत.

काढणीयोग्य आंबा काढण्याचा प्रयत्न बागायतदारांकडून सुरू आहे. परंतु वारा आणि पाऊस झाल्यास आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Crop Damage
Crop Damage : पालकमंत्री भुसे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर

सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, बुधवारी (ता. १५) रात्री जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हलका शिडकावा केला, तर अनेक भागांत ढगाळ वातावरण राहिल्याने ऐन काढणी हंगामात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोन दिवसांपासून सूर्यदर्शन उशिरा होत आहे.

सकाळी गार वारा आणि ढगाळ वातावरण निर्माण होते आहे. बुधवारी (ता. १५) वातावरणात एकदमच बदल झाला. मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, बार्शी या तालुक्यातील विजांच्या कडकडाटासह अनेक भागात हलक्या पावसाने हजेरी लावली.

परभणी -हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडलांत गुरुवारी (ता. १६) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत ढगांच्या गडगडाटात वेगाच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस झाला.

गेल्या आठवड्यापासून या दोन जिल्ह्यांत अधून मधून अवकाळी पाऊस, वाऱ्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी रब्बी पिके तसेच हळदीच्या सुगीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. सध्या या दोन जिल्ह्यांत रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांची सुगी सुरू आहे. हळद काढणीची कामे सुरू आहेत.

अवकाळी पाऊस वाऱ्यामुळे शेतातील पिके आडवी झाली. काढणी केलेली ज्वारी, गहू, हरभरा पिके भिजली. शेतातील कापूस भिजला. आंबा, संत्रा, पेरू आदींची फळगळ झाली. टरबूज, खरबूज वेल तुटले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : अवकाळीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान

वऱ्हाडात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण बनले आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाच्या सरींचे आगमन झाले. शिवाय दिवसभर ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा काढणीला तयार झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात मागील दोन दिवसांपासून पावसाच्या सरी पडत आहेत.

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वऱ्यासह हलका पाऊस झाला तर शहरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला.

या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असून गहू, हरभरा पिके काढण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

खानदेशात बुधवारी (ता. १५) सायंकाळी व रात्री अनेक भागांत वादळी पाऊस झाला. पाऊस अनेक भागात कमी होता. परंतु वादळाने ज्वारी, मका, गहू आदी पिकांची हानी झाली आहे.

४ ते ७ मार्च यादरम्यान जळगाव, धुळे व नंदुरबार गारपीट, वादळी पाऊस झाला. बुधवारी रात्री देखील नंदुरबार मधील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धुळ्यात शिरपूर, धुळे, साक्री, जळगावमधील धरणगाव, अमळनेर, जळगाव, एरंडोल, चोपडा, यावल, भुसावळ आदी भागात हलका ते मध्यम पाऊस झाला.

पण वादळ किंवा वेगाचा वारा अधिक होता. यामुळे ज्वारी, मका, मळणीवर आलेला गहू आदी पिके आडवी झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com