Dairy Business : दुग्धव्यवसायाबाबत दृष्टिकोन बदलणे गरजेचे

Dairy Farming : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातील वरिष्ठ विपणन अधिकारी अच्युत सुरवसे यांनी विकसित संकल्प अभियानाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.
Dairy Industry
Dairy Farming Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : दुग्ध व्यवसाय करून जास्तीत जास्त आर्थिक नफा कमवून बेरोजगारी काही प्रमाणात कमी करणे शक्य असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राचे पशू विज्ञान विषयाचे विषय विशेषज्ञ प्रा. सुधीर सूर्यगंध यांनी केले. ते विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत रूई (ता. हातकणंगले) येथील कार्यक्रमात बोलत होते.

उत्तम जातीच्या अधिक दूध देणाऱ्या गाई-म्हशींचे संगोपन करणे, मुक्त संचार गोठ्याची उभारणी करून कष्ट कमी करणे, सकस ओल्या व वाळलेल्या चाऱ्याचा समावेश, योग्य वेळी जनावरांचे लसीकरण व जंत निर्मूलन करणे, दुधावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणे इत्यादी बाबींवर लक्ष दिल्यास योग्य व्यवस्थापन केल्यास दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होत असल्याचे प्रा. सुधीर सूर्यगंध यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Dairy Industry
Dairy Farming : दुष्काळात संघर्षातून टिकविलेला दुग्ध व्यवसाय

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातील वरिष्ठ विपणन अधिकारी अच्युत सुरवसे यांनी विकसित संकल्प अभियानाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. सलीम अत्तार व विलास बेरड यांनी खरीप पिकाच्या बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

Dairy Industry
Dairy Farming : मेहनत, चिकाटीतून दुग्धव्यवसायात भरभराट

पिकावरील ड्रोन फवारणीची माहितीही या वेळी सांगण्यात आली. पुणे येथील फुलशेती संशोधन संचालनालयातील डॉ. अरविंद वर्मा आणि डॉ. संजय कड यांनी या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती कृषी पर्यवेक्षक राहुल कुलकर्णी यांनी दिली. डॉ. निनाद वाघ, सौरभ यादव प्रगतशील शेतकरी राजकुमार काश्मिरे, प्रियांका फाळके आणि नीलम खोत आदी उपस्थित होते. गंगासागर मोरे, बाजीराव पाटील, राजू माने यांनी नियोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com