Dairy Business : कष्ट, सातत्यातून विस्तारलेला आव्हाड दांपत्यांचा दुग्ध व्यवसाय

Milk Production : नाशिक जिल्ह्यातील चापडगाव (ता. सिन्नर) येथील संतोष व पत्नी या आव्हाड दांपत्याने २८ वर्षांपूर्वी एका गायीपासून दुग्ध व्यवसायास सुरुवात केली.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

मुकुंद पिंगळे

Dairy Farming : नाशिक जिल्ह्यातील चापडगाव (ता. सिन्नर) येथील संतोष व पत्नी या आव्हाड दांपत्याने २८ वर्षांपूर्वी एका गायीपासून दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. गोठ्यातच पैदास करीत गायींची संख्या १६ पर्यंत नेली.

आजचे दररोजचे दूध संकलन ११० लिटरपर्यंत आहे. व्यवसायाचे उत्कृष्ट नियोजन व अविरत कष्टांतून यश मिळवीत घर बांधले. वाहन घेतले. शेती विकसित केली आणि आर्थिक सक्षमता तयार केली.

नाशिक जिल्ह्यातील चापडगाव (ता. सिन्नर) येथील संतोष व शोभा या आव्हाड दांपत्याची
पाच एकर शेती आहे. पूर्वी संतोष यांचे वडील वामन पारंपरिक पद्धतीने गहू, कांदे, टोमॅटो आदींची शेती करायचे. मात्र मर्यादित उत्पन्न असल्याने कुटुंबाने दुग्ध व्यवसाय निवडला. जनावरे संगोपनाचा कुठला अनुभव नव्हता.

पण धाडस करून १९९५ मध्ये होल्स्टिन फ्रिजियन या जातिवंत गायीपासून सुरुवात केली. त्या वेळी एकत्रित कुटुंब होते. दरम्यान वडील आजारी पडले. चुलते तुळशीराम यांची दरम्यानच्या काळात किडनीची शस्त्रक्रिया झाली. औषधे आणण्यासाठीही पैसे नव्हते. अशावेळी मोठा मुलगा म्हणून संतोष यांच्यावर दुग्ध व्यवसायाची जबाबदारी आली. त्यामुळे शिक्षणाची इच्छा असतानाही नववीत असताना शाळा सोडावी लागली.

Dairy Business
Dairy Business : चिकाटी, प्रतिकूलतेतून विस्तारलेला दुग्ध व्यवसाय

सुरुवातीचे प्रयत्न

संतोष यांचा २००७ मध्ये शोभा यांच्याशी विवाह झाला. प्रतिकूल परिस्थितीत या दांपत्याने व्यवसायात सातत्य ठेवले, कधी हार मानली नाही. एका गायीपासून सुरू झालेला व्यवसाय त्यातूनच आज १६ गायींपर्यंत विस्तारला आहे.

बहुतांश गायींची पैदास गोठ्यतच झाली आहे. पूर्वी गोठा नसल्याने ऊनपावसात कधी झाडाखाली तर कधी जुन्या घरात गायी बांधल्या जायच्या. पुढे लहान भाऊ दत्ता ‘हॉटेल मॅनेजमेंट’ या विषयात पदविका पूर्ण करून प्रशिक्षणार्थी म्हणून कॅलिफोर्निया अमेरिका (२००७) येथे गेला.

प्रशिक्षण काळात त्याने चांगले अर्थार्जन केले. ही पुंजी दुग्ध व्यवसायास भांडवल म्हणून दिल्याने मोठी आर्थिक मदत झाली. सुरुवातीला आई सुमनबाई व बहीण शैला यांचीही मदत व्हायची. तिघे मिळून दूध काढणे, चारापाणी अशी कामे करीत.

सखोल ज्ञान नसल्याने आजारपणात दोन ते तीन गाई दगावल्या. तेव्हा दुधाला प्रति लिटर अवघा पाच लिटर भाव होता. पुढे मात्र संतोष यांनी व्यवसायातील सर्व बारकावे अभ्यासत व्यवस्थापनात सुधारणा केली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dairy Business
Dairy Business : शेतीपेक्षा दुग्ध व्यवसाय झाला मुख्य

दुग्ध व्यवसायातील ठळक बाबी

-१०० बाय १०० फूट आकाराचा गोठा.

-सकाळी सहा वाजता दिनक्रम सुरू. रात्री आठ वाजेपर्यंत काम सुरूच राहते.

-गव्हाण, गोठ्यात सिमेंट कोबा, गायींसाठी रबरी मॅट.

-चारा कुट्टी यंत्र, ‘दूध काढणी यंत्र, गायी स्वच्छ धुण्यासाठी फवारा यंत्रणा आदी सुविधा.

-महिन्याला दोन वेळा जनावरांची तपासणी.

-वर्षभर एक एकरात मका, लसूण घास लागवड, मुरघास, मका भरडा, शेंगदाणा पेंड, गहू भुसा
आदींचा संतुलित वापर. खाद्यात खनिज मिश्रण व कॅल्शिअम पुरवठा

-गोठा परिसरासाठी सीसीटीव्ही निगराणी

-गोचीड नियंत्रणासाठी गोठ्यात स्वच्छता. दर महिन्याला निर्जंतुकीकरण

-रेतन, खर्च, दूध उत्पादन विक्री, गायींचा संपूर्ण प्रजनन काळ, त्यासंबंधित तारखा, वासरांचा जन्म, वजन आदींच्या वेळोवेळी नोंदी.

-चारा, दूध वाहतूक आदींसाठी पिकअप वाहन

-२८ वर्षांत घेतलेले कष्ट, वक्तशीरपणा, नेटके नियोजन व भावंडांच्या एकीने व्यवसायात
वृद्धी.

Dairy Business
Dairy Business : दुग्ध व्यवसाय दुसऱ्या श्‍वेतक्रांतीच्या दिशेने...

-पशुवैद्यक डॉ. प्रकाश पानसरे, सहाय्यक पशुधन अधिकारी डॉ. विलास धुमाळ यांचे मार्गदर्शन.

-सन २०१७ मध्ये संतोष यांना नाशिक येथील आदर्श दूध उत्पादक पुरस्कार.

- पूर्वी रोजचे दूध संकलन १० ते १२ लिटर होते. आज ते १०० ते १२० लिटरपर्यंत.

- पूर्वी दूधपुरवठ्यासाठी चापडगाव किंवा दापूर येथे तीन ते पाच किलोमीटरवर जावे लागे. आता
देशातील आघाडीच्या अमूल कंपनीची गाडी थेट गोठ्यावर सकाळ व सायंकाळी दूध संकलनासाठी येते. ‘संतोषी माता डेअरी फार्म' नावाने व्यवसायाला ओळख.

अर्थकारण

-दुधाला ४.५ फॅट, तर एसएनएफ ८.५ आहे. ३४ ते ३५ रुपये प्रति लिटर दराने विक्री होते.

-महिन्याला सुमारे ४० ते ५० टक्के नफा मिळतो.

-आव्हाड दांपत्य मिळून काम करते. एकही मजूर तैनात केला नसून त्यावरील खर्चात मोठी बचत केली आहे.

-आजवर १५ ते २० कालवडी, गायींची पैदास व विक्री.

-दरवर्षी १० ते १५ ट्रॅक्टर शेणखताची उपलब्धता. शेतासाठी वापरून वर्षाआड १० ते १५ ट्रॉली विक्री.

-त्यापासून ५० ते ७५ हजारांचे अतिरिक्त उत्पन्न.

-वार्षिक १२ ते १३ लाखांची उलाढाल होते.

दुग्ध व्यवसायातून प्रगती

संतोष यांचे वडील वामन यांचे २०१५ मध्ये, तर आई सुमनबाई यांचे २०२१ मध्ये निधन झाले.
दोघांच्या कष्टांची प्रेरणा आव्हाड दांपत्याने घेतली. भाऊ दत्ता यांनी आयटीचे शिक्षण घेतले आहे.
ते काही वर्षे अमेरिकेत नोकरीस होते.

आता ते कॅनडा येथे जाणार आहेत. भाऊ व वहिनी मिताली यांच्या मोलाच्या साथीमुळे व्यवसायाला गती आल्याचे संतोष सांगतात. याच व्यवसायातून घर बांधणे, चारचाकी घेणे शक्य झाले.

पाच एकर जमीन डोंगराळ भागात असल्याने ती लागवडयोग्य करण्यासाठी मोठा खर्च आला. तो दुग्ध व्यवसायातूनच केला. शेती बटाईने देत त्यात भाजीपाला घेतला जात आहे. वैष्णोदेवी, काठमांडू आदी देशातील प्रमुख धार्मिक स्थळांना कुटुंबासहित विमानाने जाणे देखील दुग्ध व्यवसायातील उत्पन्नामुळे शक्य झाल्याचे संतोष सांगतात. भूमिराजा फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे ते संचालक आहेत.

संतोष आव्हाड, ९०११५४७८२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com