Water Stock : खामगावात मन प्रकल्पाच्या पाणी साठ्यात दररोज घट

Khamgaon Man Project : खामगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्‍तावित असलेल्‍या शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्‍पात उन्‍हाळ्याच्‍या सुरुवातीलाच अत्‍यल्‍प पाणीसाठा होता.
Khamgaon Man Project
Khamgaon Man ProjectAgrowon

Buldhana News : खामगाव तालुक्‍यातील २१ गाव पाणीपुरवठा योजना तसेच खामगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्‍तावित असलेल्‍या शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्‍पात उन्‍हाळ्याच्‍या सुरुवातीलाच अत्‍यल्‍प पाणीसाठा होता. मार्चच्‍या सुरुवातीला या प्रकल्‍पामध्ये २२ टक्‍के पाणी होते तर आता एका महिन्‍यात ७ टक्‍क्‍यांनी पातळी घटली असून सध्या १५ टक्के शिल्लक साठा असल्याची माहिती प्रकल्‍प अधिकाऱ्यांने दिली.

तालुक्यातील महत्त्वाचा असलेल्‍या शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पाच्या पाणीपातळीत यंदा पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना सुद्धा अपेक्षित वाढ झालेली नव्‍हती. त्‍यामुळे रब्‍बी हंगामासाठी पाणी मिळेल की नाही यासाठी परिसरातील शेतकरी चिंतीत होते. परंतु रब्‍बीसाठी काही भागात पाणी सोडण्यात आले.

Khamgaon Man Project
Irrigation Project Fund : सोलापुरातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांना मिळणार निधी

पावसाळा सुरू होण्याआधी या प्रकल्पातील पाणीपातळी ही ४६ टक्के होती. तर पावसाळा संपताना प्रकल्पात ५३ टक्के पाणीसाठा होता. म्हणजे पावसाळ्यात यावर्षी प्रकल्‍पाच्‍या पाणीपातळीत केवळ ९ टक्केच वाढ झाली. सद्यस्‍थितीत प्रकल्‍पात केवळ १५ टक्‍के जलसाठा आहे. अद्याप उन्हाळा संपायला अडीच महिने शिल्लक आहेत.

Khamgaon Man Project
Devna Irrigation Project : देवना सिंचन प्रकल्पाच्या कामाला कार्यारंभ आदेश प्राप्त

या मन प्रकल्पावरून २१ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परिसरातील लाखनवाडा, आंबेटाकळी, शिर्ला, कंचनपूर, बोथा, बोरी अडगाव, आसा, दूधा, चिंचपूर, फतेपूर, गवंढाळा, उमरा, अटाळी, कदमापूर, घारोड, आकोली, जयराम गड, पेंडा, शहापूर अशा २१ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. विशेष म्‍हणजे खामगाव शहरासाठी प्रस्‍तावित असलेली वाढीव पाणीपुरवठा योजनादेखील याच प्रकल्‍पावरून कार्यन्वित होणार असून, त्‍याचे काम पूर्णत्‍वास जात आहे.

मन प्रकल्पात सध्या १५ टक्केच पाणीसाठा आहे. एका महिन्‍यात ७ टक्‍क्‍यांनी पाणी पातळी खोल गेली आहे. या प्रकल्‍पावरून २१ गावांना पाणीपुरवठा होत असून, उपलब्‍ध पाणीसाठ्यातील १० टक्‍के पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल. त्‍यामुळे पाणीपुरवठा होत असलेल्‍या गावांतील ग्रामस्‍थांना कोणत्‍याच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही.
के. एस. लोहार, उपविभागीय अधिकारी, मन प्रकल्‍प

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com