Electricity Issue : अथक प्रयत्नानंतर अखेर २८ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत

Electricity Update : महावितरणच्या ३३ केव्ही सस्ती व चान्नी उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीवर उन्मळून पडलेल्या झाडांमुळे तसेच विजांच्या कडकडाटाने चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता.
Electricity Issue
Electricity IssueAgrowon
Published on
Updated on

Akola News : अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे महावितरणच्या ३३ केव्ही सस्ती व चान्नी उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीवर उन्मळून पडलेल्या झाडांमुळे तसेच विजांच्या कडकडाटाने चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नानंतर पुरवठा पुर्ववत झाला आहे.

Electricity Issue
Electricity Update : उरमोडी नदीवरील पाणी योजनेची वीजकपात

जिल्ह्यात बुधवारी (ता.१०) सायंकाळी चार वाजेदरम्यान झालेल्या वादळाचा मोठा फटका पातूर तालुक्यातील ३३ केव्ही आलेगाव, सस्ती आणि चान्नी उपकेंद्राला बसला होता. त्यामुळे तांत्रिक तथा आपत्कालीन दोष निर्माण होऊन या उपकेंद्राचा आणि उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या २८ गावांचा पुरवठा ठप्प झाला होता. ही गावे अनेक तास अंधारात गेली होती.

अतिउच्चदाब १३२ केव्ही पातूर उपकेंद्रातून ३३ केव्ही चान्नी उपकेंद्राला विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी बंद पडली होती. वादळ थांबताच २० किलोमीटर लांबी असलेल्या या वाहिनीचे फॉल्ट शोधण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोल- टू- पोल पेट्रोलिंग केले. या वाहिनीवर आकाशातील वीज आणि महावितरणच्या विजेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन या वाहिनीवरील १५ ठिकाणचे इन्सुलेटर फुटल्याचे दिसून आले.

Electricity Issue
Electricity Connection Issue : ‘जलजीवन’च्या १०३ योजनांना मिळेना वीजजोडणी

तसेच अनेक ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झालेले होते. रात्रीची वेळ असल्याने फॉल्ट शोधणे जिकिरीचे होते. तरी कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नातून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत पुरवठा पुर्ववत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आल्याने चान्नी उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या चान्नी, मळसूर, गावंडगाव, पिंपळखुटा इत्यादी १४ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला.

अतिउच्चदाब १३२ केव्ही पातूर उपकेंद्रातूनच ३३ केव्ही सस्ती विद्युत वाहिनी निघते. याच विद्युत वाहिनीला ३३ केव्ही आलेगाव उपकेंद्राचे टॅपिंग आहे. परंतु वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे वाहिनीवर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती.

तसेच अनेक ठिकाणी विजेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन खांबावरील इन्सुलेटर फुटले होते. कर्मचाऱ्यांनी रात्रीतून वीज वाहिनीवर पडलेली झाडे तोडली. तसेच फुटलेले इन्सुलेटर बदलल्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सस्ती उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या सस्ती, सुकळी, चतारी, बाभूळगाव इत्यादी १५ गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com