Jowar Fodder : दादर ज्वारीचा कडबा लवकरच उपलब्ध होणार

Dadar Jowar : खानदेशात दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध होण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. त्याचे दर मागील वेळेस साडेचार ते चार हजार रुपये प्रतिशेकडा असे आहेत.
Jowar Foder
Jowar fodderAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध होण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. त्याचे दर मागील वेळेस साडेचार ते चार हजार रुपये प्रतिशेकडा असे आहेत. ज्वारीची मळणी, काढणी पुढील पंधरवड्यात सुरू होणार असल्याने कडबा उपलब्ध होण्यास काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

कोरडवाहू दादर ज्वारीच्या कडब्याचे दर अधिकचे असतात. हा कडबा यंदा बऱ्यापैकी राहणार आहे. तो फक्त तापी, अनेर नदीच्या क्षेत्रात उपलब्ध राहणार आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी दिवाळीच्या काळात काळ्या कसदार जमिनीत जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागात झाली होती.

या क्षेत्रात पीक मळणी पुढील पंधरवड्यात सुरू होणार आहे. काही भागात पीक मळणीवर आले आहे. मागील वर्षी दादर ज्वारीच्या कडब्याचे दर प्रति शेकडा चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत होते. यंदा दर किंचित अधिक राहतील किंवा स्थिर राहतील. कारण चारा पुरेसा आहे.

Jowar Foder
Jowar Fodder : यंदा हिरव्या चाऱ्यासाठी नक्की करा ज्वारीची लागवड

यंदा खरिपात कमी चारा ओल्या दुष्काळी स्थितीमुळे उपलब्ध झाला. यामुळे चाराटंचाई काही भागात आतापर्यंत आहे. पण पुढे चारा मुबलक राहील. कारण रब्बी मुबलक पाऊस व जलसाठे यामुळे जोमात आहे. दुधाळ पशुधनाला मात्र कोरडा चारा दुरापास्त झाला आहे. कारण साठविलेला चारा संपत आला आहे आणि रब्बीतील कोरडा चारा उपलब्ध झालेला नाही.

तसेच माळरानात आता हिरवा चारा नाही. सोयाबीनचा भुसाही संपत आला आहे. तुरीचा भुसा फारसा खानदेशात नसतो. कारण तूर पेरणी सर्वत्र नाही. अशा स्थितीत पशुधनाला पुरेसा कोरडा, सकस चारा खाऊ घालणे कठीण आहे. यात आगाप दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात होणार असून, पुढे अधिकचा चारा उपलब्ध होईल.

Jowar Foder
Jowar Fodder : रब्बी पिकांचा चारा पुढील महिन्यात मिळणार

थेट शिवारातच चारा खरेदी

खानदेशात बाजार समित्या किंवा अन्य भागांत दादर ज्वारीच्या कडब्याची आवक होत नाही. खरेदीदार थेट शिवार किंवा गावातून कडब्याची खरेदी करतात. कडबा खरेदी करून त्याची कुट्टी केली जाते. लागलीच ही कुट्टी वाहतूक करून तिचा साठा केला जातो.

खानदेशात धुळ्यातील दुधाळ पशुपालक जळगाव, चोपडा व अन्य भागांतून चाऱ्याची खरेदी करीत आहेत. काही खरेदीदार बुलडाणा भागातही चाऱ्यासाठी जात आहे. रावेर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागातील दुधाळ पशुपालक व अन्य शेतकरी जळगाव, चोपडा, शिरपूर भागातून दादरच्या कडब्याची आगाऊ नोंदणी, चौकशी किंवा सौदे करीत असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com