Jowar Fodder : यंदा हिरव्या चाऱ्यासाठी नक्की करा ज्वारीची लागवड

Team Agrowon

ज्वारीच्या हिरव्या चाऱ्याची कमतरता

खरीप हंगामात पाऊस अनियमित जरी झाला, तरी ज्वारीचा चारा चांगल्या प्रकारे वाढू शकतो. धान्याच्या कापणीनंतर पिकाचा वैरणीसाठी उपयोग केला जातो; पण यात हिरवी वैरण मिळत नाही.

Jowar Fodder | Agrowon

गरजेनूसार लागवडीचे नियोजन

ज्वारीचा चारा ओला आणि वाळलेला चारा म्हणून आपण वापरत असतो. आपणास नेमका कोणत्या प्रकारच्या चाऱ्याची गरज आहे हे ध्यानात घेऊन या पिकाच्या लागवडीचे नियोजन करावे.

Jowar Fodder | Agrowon

जमीन

काळी, कसदार, मध्यम ते भारी, पण निचरा असणारी जमीन महत्त्वाची असते.

Jowar Fodder | Agrowon

पूर्वमशागत

खरिपात जून ते ऑगस्टपर्यंत, रब्बी हंगामात सप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये, उन्हाळी हंगामात फेब्रुवारी - मार्च महिन्यात पेरणी करावी.

Jowar Fodder | Agrowon

सुधारित जाती  

एम. पी. चारी, रूचिरा, पुसा चारी, फुले अमृता इत्यादी.

Jowar Fodder | Agrowon

खते

पूर्वमशागतीवेळेस हेक्‍टरी १५ ते २० गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. प्रत्येकी ५० किलो नत्र, स्फुरद, पालाश पेरणीवेळी द्यावे, तसेच पेरणीनंतर एक महिन्याने ५० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी द्यावे.

Jowar Fodder | Agrowon

उत्पादन

ज्वारीची कापणी पीक फुलोऱ्यात असताना करणे फायद्याचे आहे. ६५-७० दिवसांनी कापणी करावी. हिरव्या चाऱ्याचे ५०० ते ५५० क्विंटल प्रतिहेक्‍टरी उत्पन्न मिळते. 

Jowar Fodder | Agrowon
आणखी पाहा....