Farmer’s Market : गावरान शेतीमाल खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

Market Update : अंबाडीच्या फुलांचे लोणचे कसे आहे, गावरान बोरे चांगले आहेत ना, करडईच्या भाजीचा काय दर? असे विविध प्रश्न विचारत पुण्यातील ग्राहकांची गावरान शेतीमाल खरेदीसाठी रविवारी (ता. १५) चांगलीच झुंबड उडाली.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : अंबाडीच्या फुलांचे लोणचे कसे आहे, गावरान बोरे चांगले आहेत ना, करडईच्या भाजीचा काय दर? असे विविध प्रश्न विचारत पुण्यातील ग्राहकांची गावरान शेतीमाल खरेदीसाठी रविवारी (ता. १५) चांगलीच झुंबड उडाली. अवघ्या एक ते दीड तासामध्ये २५ हजार ४४० रुपयांच्या गावरान शेतीमालाची महिलांनी ‘शेतापासून ते ताटापर्यंत’ ही थीम घेऊन विक्री केल्याने महिलांना गावरान शेतीमाल उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळाल्याच्या भावना महिला व्यक्त करीत होत्या.

सध्या मराठवाडा व विदर्भातील पाच जिल्ह्यांत पर्यावरणस्नेही स्वावलंबी शेतीचा प्रयोग महिला किसान अधिकार मंचाच्या (मकाम) माध्यमातून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पुण्यात महिलांची पुण्यातील गांजवे चौकातील एसएमएस जोशी सभागृह येथे आढावा बैठक घेण्यात आली होती.

Agriculture Market
Agriculture Commodity Market : सर्व प्रमुख पिकांच्या किमतींत घसरण

त्यानिमित्ताने महिलांनी उत्पादित केलेल्या गावरान शेतीमालाला थेट विक्रीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये वर्ध्यातील चेतना विकास संस्था, बीडमधील जागर प्रतिष्ठान, अकोला व नागपूरमधील प्रकृती, यवतमाळमधील प्रेरणा ग्राम विकास संस्था, परभणीतील राजलक्ष्मी प्रतिष्ठान, हिंगोलीतील सह्याद्री बहुउद्देशीय संस्था, उगम ग्रामीण विकास संस्था आणि पुण्यातील सोपेकॉम या संस्थेतील महिलांनी सहभाग नोंदवला होता.

रासायनिक खते व कीटकनाशकांचे परिणाम मानवी जीवनावर जाणवू लागल्याने ग्राहकांना आता गावरान शेतीमालाचे महत्त्व कळू लागले आहे. त्यामुळे पुण्यात जिथे गावरान शेतमाल मिळेल, तेथील खरेदीकडे वळू लागला आहे. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी पुण्यातील ग्राहकांची आहे. मकामने एकदिवसीय थेट विक्रीचे प्रदर्शन भरविल्याने ग्राहकांनीही खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती.

Agriculture Market
Silkworm Market : दहा दिवसांत ५७ क्विंटल रेशीम कोषाची आवक

यामध्ये प्रामुख्याने कडधान्यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी, मटकी, तूर, मूग, उडीद, कारळ, मोहरी व सर्वप्रकारच्या डाळी ग्राहकासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच बाजरीचे पीठ, चनोळी, कळण्याचे पीठ, थालीपिठाचे पीठ, भाजीपाल्यामध्ये हादग्याची फुले, चिलाजी भाजी, हरभरा भाजी, तांदुळजा, करडईची भाजी, फळभाज्यामध्ये तुरीच्या शेंगा, हादग्याच्या शेंगा, गावरान बोर, भोपळे, टोमॅटो, वांगे तसेच गावरान देशी गाईचे तूप, हळद, अंबाडीच्या फुलाचे लोणचे, कैरी, आवळ्याचे लोणचे, पापड, विविध रंगी शेवडा, धने पावडर, विविध मसाले असे विविध प्रक्रियायुक्त उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध होती.

मी गेल्यावर्षी अंबाडीचे उत्पादन घेतले होते. त्यापासून मिळणाऱ्या फुलांचे लोणचे तयार केले होते. येथे येण्यासाठी छोट्या छोट्या बरण्यामध्ये भरून त्याची विक्री केली आहे. याशिवाय तीळ, जवस यांची विक्री केल्याने चांगला दर मिळाला. यातून गावरान शेतीमाल उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
माधुरी खडसे, महिला शेतकरी, राळेगाव, यवतमाळ
सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील मकामशी जोडलेल्या सहा जिल्ह्यांतून एकूण २५० महिला प्रयोगात सहभागी आहेत. यात प्रामुख्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, एकट्या महिला, ऊसतोड कामगार आणि अल्पभूधारक महिलांचा समावेश आहे. थेट विक्रीमुळे देशी शेतीमाल उत्पादनाला चालना मिळेल.
स्वाती सातपुते, समन्वयक, मकाम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com