Agriculture Commodity Market : सर्व प्रमुख पिकांच्या किमतींत घसरण

Cotton Rate : कापसाची आवक अजूनही वाढत्या प्रमाणावर आहे. इतरही खरीप पिकांची आवक वाढत आहे. या सप्ताहात त्यामुळे सर्वच पिकांच्या किमती घसरल्या आहेत.
Commodity Market
Commodity Market Agrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ७ ते १३ डिसेंबर २०२४

कापसाची आवक अजूनही वाढत्या प्रमाणावर आहे. इतरही खरीप पिकांची आवक वाढत आहे. या सप्ताहात त्यामुळे सर्वच पिकांच्या किमती घसरल्या आहेत. तुरीचे भाव जवळ जवळ ८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. कांदासुद्धा घसरून रु. ४,२०० वर आला आहे.

१३ डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात रु. ५५,६६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ५३,७६० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव १.६ टक्क्याने घसरून रु. ५४,७६० वर आले आहेत. मार्च भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.२ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाची आवक वाढती आहे.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात १.२ टक्क्याने घसरून रु. १,३९८ वर आले आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स ३.२ टक्क्यांनी वाढून रु. १,४८२ वर आले आहेत, तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,५०२ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ७.४ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. सध्याचे भाव (स्पॉट व फ्यूचर्स) हमीभावापेक्षा कमी आहेत.

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २,४५० वर आल्या आहेत. जानेवारी फ्यूचर्स किमती रु. २,४६९ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स रु. २,४९७ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.९ टक्क्याने अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात १.५ टक्क्याने घसरून रु. १३,७२३ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती १.५ टक्क्याने घसरून रु. १३,९७२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.८ टक्क्याने अधिक आहेत.

Commodity Market
Chana Sowing : रब्बीत हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) या सप्ताहात ३ टक्क्यांनी घसरून रु. ६,६५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७.८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. किमती कमी होत आहेत.

Commodity Market
Soybean Procurement : सोयाबीन खरेदीची घोषणा; मात्र प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेत त्रुटी

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,२४२ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे.

तूर

या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) ७.८ टक्क्यांनी घसरून रु. ९,२९७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. नवीन पिकाची आवक जानेवारी अखेर सुरू होईल.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात पुन्हा घसरून रु. ४,२०७ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून रु. २,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com