Curry Leaves : आहारात असावा कढीपत्त्याचा समावेश

Curry Leaves Benefits : सर्वांना परिचित असलेला कढीपत्ता हा अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्यातील विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे कढीपत्त्याचा नियमित आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
Curry Leaves
Curry LeavesAgrowon

दीपाली संगेकर, डॉ. विजया पवार

Health Benefits of Curry Leaves : दैनंदिन आहारात कढीपत्त्याचा समावेश कमीअधिक प्रमाणात केला जातो. कढीपत्ता व कढीपत्त्याच्या पानांमुळे जेवणाची चव वाढते. कढीपत्ता ही भारतीय उपखंडात उगवणारी एक महत्त्वपूर्ण वनस्पती आहे.

आयुर्वेदात कढीपत्त्याला एक उपयुक्त औषधी वनस्पती म्हणून उल्लेख केला जातो. विविध खाद्यपदार्थांना तडका देण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला होतो. त्यामुळे खाद्यपदार्थांना एक विशिष्ट चव आणि सुवास येतो. कढीपत्त्याचे झाड साधारणतः २ ते ६ मीटर उंचीचे असते. पाने दिसायला ताजी, गडद हिरव्या रंगाची असतात.

आरोग्यदायी फायदे

पचनशक्ती सुधारते ः कढीपत्ता पचनक्रियेला मदत करतो. त्यामधील तंतुमय पदार्थ अन्न पचनास मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे ः कढीपत्ता मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त मानला जातो. कढीपत्त्यामधील पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. कढीपत्त्याचा रसाचा रक्त शुद्ध करण्यासाठी वापर केला जातो. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्वचा तजेलदार होते.

Curry Leaves
Medicinal Leaves : फळपिकांच्या पानांमधील औषधी गुणधर्म

केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कढीपत्ता उपयुक्त आहे. कढीपत्त्यामुळे केस गळती कमी होते. केसांना मजबुती मिळते.

कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता मदत करतो. त्यामधील तंतुमय पदार्थ चयापचय क्रिया वाढवितात आणि शरीरातील मेद कमी होण्यास मदत करतात. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी दैनंदिन आहारात कढीपत्त्याचा अवश्य समावेश करावा.

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी कढीपत्त्या गुणकारी मानला जातो. कढीपत्त्यातील जीवनसत्त्व अ डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

Curry Leaves
Tea Production : चहापत्तीचे दर वाढणार ; चहा उत्पादनात यंदा ५० टक्क्यांनी घट

कढीपत्त्यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुणधर्म शरीराचे संसर्गजन्य आजारांपासून बचाव करतात.

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे. त्यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे हृदयाच्या कार्यक्षमता वाढवितात. रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी कडीपत्त्यामध्ये विविध गुणधर्म असतात. त्यामुळे कढीपत्ता सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातो.

ट्रायग्लिसराइडची पातळी जास्त असल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.

कढीपत्त्याचे नियमित सेवन रक्तातील ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास मदत होते. तसेच रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. हृदयाचे आरोग्य राखले जाते.

कढीपत्त्यातील विविध पोषक घटक, जसे की जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व ई आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

पोषकमूल्य (१०० ग्रॅम प्रमाणे)

पोषक घटक मूल्य

ऊर्जा (कॅलरी) १०८ कॅलरी

प्रथिने ६.१ ग्रॅम

स्निग्ध पदार्थ १.० ग्रॅम

कार्बोहायड्रेट्स १८.७ ग्रॅम

तंतुमय पदार्थ ६.४ ग्रॅम

फॉस्फरस ५७ मिलीग्रॅम

लोह ०.९३ मिलीग्रॅम

मॅग्नेशिअम ४४ मिलीग्रॅम

कॅल्शिअम ४६६ मिलीग्रॅम

जीवनसत्त्व क ४ मिलीग्रॅम

दीपाली संगेकर, (आचार्य पदवी विद्यार्थीनी) ९८३४९७२९१३ - डॉ. विजया पवार, ९४२०६२६५३३

(अन्न विज्ञान आणि पोषण सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com